शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ दांपत्याला बाथरुममध्ये कोंडून १५ लाख ८० हजारांचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:12 IST

सिंध सोसायटीतील प्रकार ; दहा मिनीटात बाहेर पडल्यावर मारहाणीची धमकी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : औंध येथील सिंध सोसायटीमधील ...

सिंध सोसायटीतील प्रकार ; दहा मिनीटात बाहेर पडल्यावर मारहाणीची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : औंध येथील सिंध सोसायटीमधील एका बंगल्यात शिरुन ज्येष्ठ दाम्पत्य व त्यांच्या कुकला चाकूचा धाक दाखवून बाथरुममध्ये कोंडले व घरातील १५ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना रविवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

चोरट्यांनी बाथरुमचा दरवाजा १० मिनिटे उघडायचा नाही. उघडला तर पुन्हा येऊन मारु असा दम दिला होता. त्यामुळे चोरटे गेल्यानंतर बऱ्याच वेळाने हे दाम्पत्य बाहेर आले व त्यांनी मुलाला फोन करुन ही घटना सांगितली. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

याप्रकरणी एका ७३ वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. औंध येथील सिंध सोसायटीतील बंगला क्रमांक ८१७ मध्ये फिर्यादी ह्या पतीसह राहतात. त्यांच्याकडे एक केअर टेकर व कुक म्हणून काम करतो. तो त्यांच्याकडेच राहतो. रविवारी रात्री तिघे जण बंगल्यात शिरुन किचनच्या बाजूने येत असल्याचे कुकने पाहिले. त्याने हटकल्यावरपण तिघे घरात शिरले. त्यांनी कुकच्या पोटाला चाकू लावून त्याची झडती घेत पैशांची मागणी केली. त्यानंतर ते कुकला घेऊन पहिल्या मजल्यावरील बेडरुममध्ये आले. तेव्हा या महिलेने त्यांच्याबद्दल विचारल्यावर त्यांच्यातील एक जण त्यांच्याजवळ आला. त्याने पैसा पैसा असे म्हणत या महिलेच्या गळ्याला चाकू लावला. त्यांच्याकडील पर्स हिसकावून घेतली. त्यानंतर दुसर्‍या चोरट्याने त्यांच्या पतीच्या गळ्याला चाकू लावून पैसा किधर रखे है, असे विचारुन मारहाण करु लागले. त्यावेळी फिर्यादी महिलेने मारहाण करु नका असे म्हणून त्यांना बेडरुमचे कपाट उघडून दिले. त्यांनी कपाटातील ऐवज काढून घेतला. तसेच त्यांच्या हातातील अंगठ्याही जबरदस्तीने काढून घेतल्या. त्यानंतर चोरट्यांनी तिघांना बाथरुममध्ये बंद केले.

चोरट्यांनी त्यांच्याकडील हिरे, सोने, खडे असलेल्या १२ अंगठ्या, कानातील रिंग, हिर्‍याची रिंग, मोत्याचा चोकर, दोन हार, सोनसाखळी, मंगळसुत्र, दोन ब्रेसलेट, ५ लेडिज घड्याळे, ५ चांदीचे कॉईन, ७० हजार रुपये रोख व १ हजार युएस डॉलर असा १५ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

या घटनेची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करण्यात सुरुवात केली आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

़़़़़

चोरट्यांनी पळून जाण्यापूर्वी सर्वांना बाथरुममध्ये कोंडले होते. त्यांच्या हातात घरातील भिंतीवरील घड्याळ दिले़ दहा मिनिटे होईपर्यंत बाहेर यायचे नाही, नाही तर पुन्हा येऊन मारुन टाकेन, अशी धमकी दिली. त्या दाम्पत्याचा मोबाईलवर फोटो काढून घेतला़ त्यामुळे घाबरलेले हे दाम्पत्य व कुक जवळपास २० मिनिटे आतच होते. चोरटे गेल्याचे लक्षात आल्यावर दरवाजा तोडून ते बाहेर आले व त्यांनी मुलाशी संपर्क साधला.