उत्तमराव नारायण भोसले (वय ७०, रा. कांबळेश्वर, ता. बारामती) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि. १३) सकाळी घडली. या प्रकरणी कालिदास उत्तमराव भोसले (रा. हांडेवाडी चौक, हडपसर, पुणे, मूळ रा. कांबळेश्वर) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीचे वडील कांबळेश्वर येथे राहतात. मंगळवारी (दि १३) सकाळी दुचाकीवरून बारामतीकडे जात होते. यावेळी महालक्ष्मी ढाब्या पुढे त्यांच्या दुचाकीला फलटण बाजूने येणाऱ्या एका वाहनाने धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर वाहन न थांबवताच चालक पसार झाला. जखमी भोसले यांना उपचारासाठी बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांचा मृत्यु झाल्याचे घोषित केले.
वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:09 IST