शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कुरकुंभ येथील आठवडेबाजारही भरावा ‘सातच्या आत’

By admin | Updated: January 21, 2016 01:11 IST

येथील गुरुवारी भरत असलेला आठवडेबाजार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सायंकाळी सात वाजेपर्यंतच चालविण्याबाबत सर्व व्यावसायिकांना नोटीस देण्यात येणार

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील गुरुवारी भरत असलेला आठवडेबाजार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सायंकाळी सात वाजेपर्यंतच चालविण्याबाबत सर्व व्यावसायिकांना नोटीस देण्यात येणार असल्याचे सरपंच जयश्री भागवत यांनी सांगितले.येथील औद्योगिक क्षेत्रामधील वाढती लोकसंख्या, परिसरातील बदलत्या नागरीकरणामुळे अल्पावधीत या आठवडेबाजाराची उलाढाल लाखोच्या घरात जाऊन पोहोचली. परिणामी मोठ्या प्रमाणात व्यावसायिक या ठिकाणी आवर्जून येत राहतात, मात्र रात्री नऊ वाजण्याच्या सुमारासदेखील हा बाजार चालूच राहत असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बहुसंख्येने औद्योगिक क्षेत्रामधील तसेच परिसरातील ग्रामीण भागातील महिला, कामगार, व्यावसायिक या ठिकाणी येतात. बऱ्याच वेळा मोबाइल चोरी, पाकीट चोरी, व्यावसायिकांना लुटणे, मालाची चोरी होण्याच्या घटना या ठिकाणी घडल्या आहेत. या बाजारासाठी साधारणत: दुपारपासून गर्दी सुरू होते, मात्र याबाबत सकाळपासूनची वेळ निश्चित करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, उशिरापर्यंत महिला तसेच व्यावसायिक यांच्याबाबतीत कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, तसेच भविष्यात सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही समस्या निर्माण होऊ न देण्याच्या दृष्टिकोन ठेवण्यात येणार आहे.वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी होत आहे.