चंदननगर येथील आंबेडकरनगर वस्तीत १८ ते ४० वयोगटातील अनेक निरक्षर महिला आहेत. असे संस्थेच्या सर्वेक्षणातून समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर शिकण्यास उत्सुक असलेल्या महिलांची यादी तयार केली. परंतु, महिला घर सांभाळून बाहेर शिकायला येऊ शकत नव्हत्या. अशा वेळी वस्तीतील अथवा वस्तीबाहेरील शिक्षिकांशी संपर्क साधला. त्यांना उपक्रमाची माहिती दिली. जवळपास १० शिक्षिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या शिक्षिकांनी महिलांच्या वेळेनुसार शिकवण्यास सुरुवात केली. या अभ्यासक्रमात लिहिता-वाचता येणे, बेरीज-वजाबाकी, वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावणे याचा समावेश होता. हा कोर्स पूर्ण झाल्यावर नवसाक्षर महिलेत एक विलक्षण आत्मविश्वास पाहायला मिळत आहे. आंबेडकर वस्तीत गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम चालू आहे. त्यामध्ये ७० महिलांना साक्षर केले आहे. पुणे शहरातील अनेक वस्तीमध्ये हा उपक्रम चालू करण्याचा सर्वांगीण विकास संस्थेचा मानस आहे.
वस्तीतील महिलांना शैक्षणिक आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:15 IST