शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
3
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
4
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
5
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
6
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
7
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
8
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
9
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
10
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
11
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
12
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
13
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
14
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
15
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
16
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
17
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
18
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
19
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
20
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का

शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: March 20, 2015 23:03 IST

पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी कचरू सदाशिव दोडके (वय ५५) यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

बारामती : पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी कचरू सदाशिव दोडके (वय ५५) यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोडके हे मूळ बेलसर (ता. वेल्हा) येथील राहणार होते. सध्या ते बारामती शहरात वास्तव्यास होते. बारामती शहर व परिसरात स्वाइन फ्लूने आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. दोडके हे नुकत्याच संपलेल्या दहावी माध्यमिक परीक्षेचे बारामती विभागाचे परीक्षा नियंत्रक म्हणून काम पाहत होते. त्यांना शनिवारी (दि. १४) थंडी-तापाचा त्रास होत असल्याने सांगवी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांना तेव्हा टायफायड झाल्याचे निदान करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर उपचारांनतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, रविवारी त्यांची तब्येत बिघडल्यानंतर, त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी (दि.१८) त्यांना स्वाइन फ्लू, न्यूमोनिया,किडनी निकामी झाल्याचे निदान करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. परीक्षेमुळे टाळले उपचार के . एस. दोडके हे दहावी परीक्षेसाठी बारामती विभागाचे परीक्षा नियंत्रक होते. त्यामुळे १३ केंद्रांतील विद्यार्थ्यांची त्यांच्यावर जबाबदारी होती. या दरम्यान परीक्षा सुरू असल्याने शारीरिक त्रास जाणवूनदेखील त्यांनी तब्येतीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर स्वाइन फ्लू आजाराने गंभीर स्वरूप धारण केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी पंचायत समिती परिसरात चर्चा होती. बारामती पंचायत समितीती श्रद्धांजली बारामती पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी दोडके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आज सकाळी दोडके यांच्या मृत्यूची बातमी पंचायत समिती कार्यालयात समजली. त्यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे अचानक झालेल्या दोडके यांच्या मृत्यूची, मनमिळावू स्वभवाची या ठिकाणी दिवसभर चर्चा होती.