शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट डिग्रीचा व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्याने शिक्षणाची वाट लागली-अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:50 IST

सरकार शिक्षणाबाबत गंभीर नाही, मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या निकालाच्या दिरंगाईला फक्त विद्यापीठाचा कुलगुरु जबाबदार नसून शिक्षणमंत्रीही त्याला जबाबदार आहेत.

पुणे : सरकार शिक्षणाबाबत गंभीर नाही, मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या निकालाच्या दिरंगाईला फक्त विद्यापीठाचा कुलगुरु जबाबदार नसून शिक्षणमंत्रीही त्याला जबाबदार आहेत. शिक्षकांकडे, त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. बनावट डिग्री असलेली व्यक्ती राज्याचा शिक्षणमंत्री झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे नाव न घेताही जोरदार टीका केली.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित बाबूराव घोलप पुरस्कार वितरण कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा अ‍ॅड. वंदना चव्हाण, महापालिकेतील नेते चेतन तुपे, बाबूराव चांदेरे, जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव संदीप कदम, राजेंद्र घाडगे, मोहन देशमुख आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, ‘‘राज्यातील शिक्षकांची भरती बंद आहे, बीपीएडची तर वाट लागलीय, मानधन प्रलंबित आहे. मुंबई विद्यापीठाचा अद्याप निकाल नाही. मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल हे फक्त कुलगुरुंचे अपयश नसून शिक्षण मंत्रीही त्याला पूर्ण जबाबदार असल्याची टीका पवार यांनी केली. शिक्षक पुरस्कार वेळेवर दिले जात नाहीत, गरिबांसाठी असलेल्या शिष्यवृत्तीवर मंत्र्यांच्या मुलांना परेदशात शिक्षणासाठी पाठवले जाते, अभ्यासक्रमात कुठला धडा असावा, तसेच कुठला नसावा, कोणाला वगळावं, वगळू नये यामध्ये हस्तक्षेप सुरू आहे.शिक्षणाबाबतची तक्रार कोणाकडे करायची, हा प्रश्न पडलेला आहे. सरकारकडून शिक्षणाची थट्टा सुरू असून सरकार सरसकट शिक्षण संस्थांना दरोडेखोर म्हणून शिक्षणाचा अपमान करीत आहे. तसेच शिक्षण विभागाने दहा लाख विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळायचे असे सांगितले. मात्र, एक दिवस फुटबॉल खेळून राज्य फुटबॉलमय होणार आहे का,’’ असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला.