शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक प्रकरणी शिक्षा

By admin | Updated: December 23, 2016 00:58 IST

पुण्यातील सदाशिव पेठेतील बॉस्को फर्निशिंग प्रा. लि. चे अरविंद माणिकलाल शहा यांनी मधुर प्रिंटस, सुरत यांच्याकडून पडद्यासाठी

पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेतील बॉस्को फर्निशिंग प्रा. लि. चे अरविंद माणिकलाल शहा यांनी मधुर प्रिंटस, सुरत यांच्याकडून पडद्यासाठी कापड मालाची आॅगस्ट १९९८ मध्ये मागणी केली होती. मात्र त्यांच्या दुकानापासून शेजारीच असलेल्या भावाने सदर कपड्याचा मालाचा ट्रक, माल उतरविण्यासाठी आल्यानंतर सख्खा भावाचे दुकान बंद असल्याचा फायदा घेऊन स्वत:च्या दुकानात माल उरतरवून घेत त्यानंतर अरेरावी केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी प्रथम न्यायवर्ग दंडाधिकारी एस. बी. कुलकर्णी यांच्या न्यायालयाने दोषी भावाला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.रणजित माणिकलाल शहा (वय ६२, रा. सदाशिव पेठ) असे शिक्षा सुनविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वयोमान व प्रकृती अस्वस्थेच्या कारणामुळे २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर एक वर्षांकरीता सदवर्तनाच्या हमीवर सुटका केली आहे. याबाबत अरविंद माणिकलाल शहा यांनी तक्रार दाखल केली होती. मात्र केसच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने, त्यांच्या वतीने आशय अरविंद शहा यांनी केस पुढे चालवली. अरविंद शहा व रणजित शहा यांच्यात दुरावा झाल्याने दोन्ही कुटुंब एकमेकापासून विभक्त झाले होते. अरविंद शहा यांच्या दुकानाशेजारीच रणजित शहा यांचे बॉस्को डिपार्टमेंट व सिद्धार्थ फर्निशिग नावाचे दुकान आहे. सुरत येथून जे. डी. रोडवेज यांच्या ट्रान्सपोर्टने कपड्याच्या मालाची आॅर्डर आली असता, भावाचे दुकान बंद पाहून रणजित यांनी सदर माल स्विकारून चलनावर सही केली. सदर केस दाखल झाल्यानंतर रणजित शहा यांनी तक्रारदाराशी समझोता करावा याकरिता, दबाव आणुन सतत त्रास देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याची बाब न्यायालयात सिद्ध झाली आहे. फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. महेश गोगावले यांनी चार साक्षीदार तपासले. (प्रतिनिधी)