पुणे : महापालिका शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी मंडळाचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून या पदासाठी लक्ष्मीकांत खाबिया व वासंती काकडे दावेदार मानले जात आहेत. एक महिला कार्यकर्ती म्हणून काकडे यांचे नाव आघाडीवर असल्याची राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा आहे. शिक्षण मंडळात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आणि उपाध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रदीप धुमाळ यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी उपाध्यक्ष नुरुद्दीन सोमजी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक सोमवारी दुपारी ३ वाजता होणार आहे. (प्रतिनिधी)
शिक्षण मंडळ अध्यक्षपदी वासंती काकडे?
By admin | Updated: August 17, 2015 02:34 IST