शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्था बळकट होईल

By admin | Updated: June 10, 2017 02:20 IST

आपण इतर देशांवर अवलंबून असून साधनसामग्री आयात करतो. मेक इन इंडियाच्या चळवळीत अंटार्क्टिका महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आपण इतर देशांवर अवलंबून असून साधनसामग्री आयात करतो. मेक इन इंडियाच्या चळवळीत अंटार्क्टिका महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते. अंटार्क्टिकाबाबत जागृती वाढण्याची गरज असून माध्यमांनी या विषयावर सातत्याने प्रकाश टाकला पाहिजे. अंटार्क्टिकाशी संबंध प्रस्थापित करुन भारतीय अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते, असे मत एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी शुक्रवारी व्यक्त केले.पहिले भारतीय अंटार्क्टिक स्टेशन दक्षिण गंगोत्री येथे स्टेशन कमांडर म्हणून नेतृत्व केलेल्या लेफ्टनंट कर्नल डॉ. जगदीश खाडिलकर लिखित ‘अंटार्क्टिका - द फ्रोझन काँटिनेंटस एनव्हायर्नमेंट चेंजिंग लॉजिस्टिक्स टू इंडिया’ या पुस्तकाचे प्रकाशन सिम्बायोसिस संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे आणि ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे उपस्थित होते. ब्लूम्सबरी पब्लिशिंग इंडिया लिमिटेड या संस्थेने पुस्तक प्रकाशित केले आहे.गोखले म्हणाले, ‘अंटार्क्टिका खंडावरील हालचाली योग्य नाहीत. भारताचे तेथील अस्तित्व महत्त्वाचे आहे. अंटार्क्टिकाकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास त्याचा सुरक्षेच्या दृष्टीने देशाला फायदा होऊ शकतो. अंटार्क्टिका येथील मासे अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरू शकतात. तैवानसारखे अनेक देश या जोरावर आपली अर्थव्यवस्था बळकट करत आहेत. अंटार्क्टिका हे भारतापासून ३० हजार किलोमीटर अंतरावर आहे. आपल्याकडील मान्सूनच्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा आहे.’मेधा रबडे यांनी सूत्रसंचालन केले. ललिता मराठे यांनी आभार मानले.