शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक विसर्जनाला शासनाकडूनच हरताळ, शिक्षण विभागाचा फतवा, विद्यार्थ्यांच्या सहभागी होण्यावर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:32 IST

महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्याचे टाळावे, असे आदेश उच्च शिक्षणालयाकडून पुणे विभागातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.

- दीपक जाधव ।पुणे : महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होण्याचे टाळावे, असे आदेश उच्च शिक्षणालयाकडून पुणे विभागातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने लगेच या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे.औरंगाबाद खंडपीठाने एका याचिकेवर निर्णय देताना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्यास राज्य शासनाला सांगितले होते. त्यानुसार तत्कालीन आघाडी सरकारने हा कार्यक्रम शाळा, महाविद्यालय पातळीवर स्वीकारला होता.मात्र पुणे उच्च शिक्षण विभागाकडून काढण्यात आलेल्या एका आदेशामुळे याला मोठा धक्का बसला आहे. उच्च शिक्षण विभागाचे सह संचालक विजय नारखेडे यांना २८ आॅगस्ट रोजी हिंदू जनजागृती समितीने एक पत्र दिले होते. त्यामध्ये महाविद्यालयातील तरुण पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करावे म्हणून लोकांवर दबाब टाकतात, त्यांना मनाई करावी, अशी मागणी होती. सहसंचालकांनी लगेच, महाविद्यालयांनी या पत्रानुसार चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी असे आदेश काढले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सहसंचालकांचे हे पत्र मिळाल्यानंतर त्यांनीही विद्यार्थ्यांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, असे निर्देश विद्यार्थी कल्याण मंडळ संचालकांच्या स्वाक्षरीने सर्व महाविद्यालयांना दिले.- एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या घरच्या गणपतीचे मुलीच्या हस्ते पर्यावरणपूरक विसर्जन करून चांगला संदेश दिला असताना शिक्षण विभागाकडून त्याविरोधात कृती करण्यात आली आहे. ‘आॅनलाइन लोकमत’वर शनिवारी दुपारी याबाबतचे वृत्त सर्वांत पहिल्यांदा ब्रेक करण्यात आले. त्यानंतर याचे जोरदार पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.अधिका-यांची चौकशी करून कारवाई व्हावीऔरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने पर्यावरणपूरक गणेश विसर्जन हा कार्यक्रम स्वीकारला असताना शिक्षण विभागातील एखादा अधिकारी त्याविरोधात परस्पर आदेश काढत असेल तर हे गंभीर आहे.- हमीद दाभोलकर, सरचिटणीस, अंधश्रद्धा निर्मूलन समितीकृत्रिम तलावात गणेश विसर्जन करणे धार्मिकतेशी विसंगत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यापासून थांबवावे असे पत्र हिंदू जनजागृती समितीने दिले होते. त्यानुसार तपासून कार्यवाही करावी, असे पत्र काढण्यात आले आहे.- विजय नारखेडे, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग