कोथरूड : शहरातील सामाजिक संस्थांनी केलेल्या प्रबोधनाने पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणोशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. घरातील गणोशमूर्ती अन् सार्वजनिक मंडळाच्या वतीने विधीवत पूजा करण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तीला प्राधान्य देण्यात येत असल्याने या भागातील शाडू मातीच्या मूत्र्याना मागणी वाढत आहे.
कोथरूड भागातील अनेक घरगुती प्रतिष्ठापनेच्या सार्वजनिक मंडळांच्या मूत्र्या विसर्जित करण्यासाठी सार्वजनिक हौदाचा वापर केला जात असल्याने न विरघळणा:या मूर्तीची समस्या वाढत असल्याने कोथरूड भागातील नागरिक शाडू मातीच्या मूत्र्याना प्राधान्य देत आहेत.
त्यातच पुणो महापालिकेच्या वतीने कोथरूड व वारजे कर्वेनगर सहायक आयुक्तांनीही पर्यावरणपूरक विरघळणा:या मूत्र्या बसवण्याचे आवाहन केल्याने परिसरातील नागरिक त्यास प्राधान्य देत आहेत.
कोथरूड भागात सध्या अनेक विक्रेते शाडू मातीच्या मूर्तीची विक्री करत आहेत. (वार्ताहर)
फसवणुकीला
बळी पडू नये
बाजारातील शाडू मातीच्या गणोशमूर्तीची कमतरता असल्याने अनेक व्यावसायिक प्लॅस्टरच्या मूर्ती विकतात. त्यातच अनेक व्यावसायिक शाोक्त नावाने हळूवार विरघळणारी मूर्ती देऊन फसवणूक करतात. पुणो, मुंबईसह, नाशिक, गुजरात भागातून शाडूच्या मूत्र्याना मागणी वाढली असून, व्यावसायिक ग्राहकांना आकर्षित करत असले तरी शाडूचीच मूर्ती खरेदी करावी. फसवणुकीला बळी पडू नये.
-सीताराम खाडे,
शाडू मातीचे विक्रेते