शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
4
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
5
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
6
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
7
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
8
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
9
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
10
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
11
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
12
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
13
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
14
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
15
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
16
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
17
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
18
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
19
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
20
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ

भामा-आसखेडला गाळाचे ग्रहण

By admin | Updated: May 10, 2017 03:48 IST

खास शेतीला पाणीपुरवठा व्हावा, म्हणून बांधण्यात आलेल्या भामा-आसखेड धरणाच्या जलाशयात सध्या गाळ साचण्याचे

लोकमत न्यूज नेटवर्कआंबेठाण : खास शेतीला पाणीपुरवठा व्हावा, म्हणून बांधण्यात आलेल्या भामा-आसखेड धरणाच्या जलाशयात सध्या गाळ साचण्याचे प्रमाण अधिक आणि पाणीसाठा मात्र कमी होत चालला आहे. धरणाची पाणी साठवणक्षमता जरी ८.१४ टीएमसी असली तरी वाढत्या गाळामुळे धरणाच्या साठवणक्षमतेवर परिणाम झाला आहे. धरणाचे दोन्ही कालवे पूर्ण झाले असते तर धरणाच्या पाण्यावर ३८ हजार १५४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असते. परंतु कालवे न झाल्याने किती क्षेत्र सिंचनाखाली आले, याचे उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे. खेड तालुक्यासह दौंड आणि हवेली तालुक्याला या पाण्याचा फायदा होत असून त्यामुळे तिन्ही तालुक्यांतील जमीन सिंचनाखाली आली आहे. धरण जरी ८.१४ टीएमसी पाण्याच्या क्षमतेचे असले तरी प्रत्यक्षात मात्र एवढा पाणीसाठा होत नाही. कारण धरणाच्या पाण्याचा फुगवटा हा जवळपास २५ किमीपर्यंत आहे. धरणाच्या क्षेत्रात जवळपास ४० किमी अंतरावरून अन् सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून पाणी वाहत येत असते. हे वाहत येणारे पाणी तीव्र उतारावरून वाहत येत असल्याने पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात माती वाहून येत असून धरणक्षेत्रात गाळ मोठ्या प्रमाणात साचत चालला आहे. त्यामुळे धरणाची खोली कमी होत असून पात्र उथळ होत आहे. याचा परिणाम साठवणक्षमतेवर झाला आहे. हजारो ब्रास मातीसाठा निघेल, अशी स्थिती सध्या या धरणात आहे.