शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा पूर्व भाग अद्याप कोरडाच!

By admin | Updated: July 24, 2015 04:01 IST

जूनची सरासरी ओलांडून गायब झालेला पाऊस गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू आहे. मात्र पूर्व भागाकडे त्याने अद्यापही डोळे वटारले आहेत

पुणे : जूनची सरासरी ओलांडून गायब झालेला पाऊस गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू आहे. मात्र पूर्व भागाकडे त्याने अद्यापही डोळे वटारले आहेत. बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड तालुुक्यांत वाट पाहणाऱ्या बळीराजाला तो हुलकावणी देत असून, अद्याप हा भाग कोरडाच राहिला आहे.५ जूनला जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. दोन दिवस दमदार पाऊस झाल्यानंतर त्याने विश्रांती घेतली. त्यानंतर महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला. मात्र, तो म्हणावा तसा बरसला नाही. मात्र २५ जूननंतर तीन दिवस जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावत जूनची सरासरी ओलांडली. २२७.९३ मिलिमीटर पाऊस झाला. जूनच्या शेवटच्या दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा गायब झाला. साधरण २0 दिवस जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा उन्हाळा अनुभवला. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपसून पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार मि.मी. पाऊस झाला. त्यात सर्वाधिक मावळ तालुक्यात २५४ मि.मी., त्यानंतर मुळशीत २0७, भोरमध्ये १६६, जुन्नरमध्ये १0७, वेल्हे तालुक्यात १0३, खेडमध्ये ६६.७३ मिलिमीटर पाऊस झाला. मात्र त्याने बारामती, इंदापूर, पुरंदर व दौंड तालुक्यांकडे डोळे वटारले आहेत. बारामतीत पुनरागमनानंतर फक्त 0.५0 , दौंडमध्ये ८.८७, इंदापुरात 0.८७, पुरंदरमध्ये ८.५७ व शिरूरमध्ये ६.७१ इतकाच पाऊस झाला आहे. त्यामुळे येथील बळराजा चिंतेत असून, पिण्याच्या पाण्यासाठीही त्याची पुन्हा वणवण सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात टँकरची संख्या कमी होऊन १८ वर आली होती. आता पुन्हा त्यात १ टँकर वाढला आहे, तो बारामती तालुक्यात. (प्रतिनिधी)