शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ई-निविदामधील अट काढून टाकली

By admin | Updated: April 26, 2017 02:57 IST

ई-निविदांमध्ये गोपनीयता रहावी, तसेच कामाचा दर्जा टिकण्यासाठी स्पर्धा व्हावी, यासाठी ई-निविदा प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

बारामती : ई-निविदांमध्ये गोपनीयता रहावी, तसेच कामाचा दर्जा टिकण्यासाठी स्पर्धा व्हावी, यासाठी ई-निविदा प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यातून पळवाटा काढण्याचा प्रयत्न नगरसेवकांनी हाणून पाडला. त्यामुळे बारामती नगरपालिका प्रशासनाने आता ई-निविदांमध्ये घातलेली अट काढून टाकली. त्यामुळे विकास कामांमध्ये स्पर्धा होईल, अशी अपेक्षा व्यक्त बारामती नगरपालिकेच्या विविध विकास कामांच्या संदर्भात ई-निविदा प्रसिद्ध करताना ठेकेदारांकडून मूळ कागदपत्रे व बयाणा रक्कम भरल्याची पावती प्रशासनाकडून मागितली जाते. त्यामुळे ई-निविदा सादर करण्याचा मूळ उद्देश सफल होत नाही, ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक संजय संघवी यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणली. त्यामध्ये ई-निविदा भरल्यानंतर ठेकेदारांकडून मूळ कागदपत्रे व बयाणा रक्कम भरलेल्या पावतीची मूळ पत्र मागितली जाते. त्यानंतर निविदा उघडल्या जातात. त्यामुळे खऱ्या अर्थाने स्पर्धा होत नाही. अगोदरच निविदांची माहिती होत असल्याने ठेकेदारांमध्ये देखील ‘रिंग’ होण्याची शक्यता असते. त्यामुळे निविदा उघडण्यापूर्वी घातलेली मूळ कागदपत्रे सादर करण्याची अट यापुढे काढून टाकावी, अशी मागणी त्यांनी केली. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनाच्या पूर्वी आली नव्हती. त्यामुळे यापुढे ई-निविदा करताना ही त्रुटी दूर केली जाईल, असे मुख्याधिकारी निलेश देशमुख यांनी यावेळी सांगितले. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी देखील नगरसेवकांच्या मागणीनुसार ई-निविदांमध्ये दुरुस्ती करून प्रसिद्धीकरण करण्यात यावे, अशी सूचना प्रशासनाला दिली. त्यानुसार यापूर्वी प्रसिद्धीकरण करण्यात आलेल्या ई-निविदांमधून अट काढून टाकण्यात आली आहे. आजपासूनच त्यावर अंमलबजावणी करण्यात आली, असे ई-निविदा कक्षाकडून सांगण्यात आले. कोणत्याही विकास कामासाठी स्पर्धा होण्यासाठी ई-निविदा पद्धत सुरू करण्यात आली. मात्र, ई-निविदा सादर केलेल्या ठेकेदारांना दोन दिवस अगोदर अनामत रक्कम भरल्याची पावती सादर करण्याचे सूचना दिल्या होत्या. त्यामुळे निविदा उघडण्यापूर्वीच ठेकेदारांनी निविदेमध्ये सादर केलेले दर दिसून येत. त्यामुळे खरी स्पर्धा होत नव्हती. आता पालिकेने ती अट काढून टाकल्यामुळे नव्याने प्रसिद्धीकरण करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)