शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ई-व्यवहाराचा वाढला भाव

By admin | Updated: November 15, 2016 03:57 IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता कोणत्याही वस्तूची खरेदी, हॉटेलिंग किंवा इतर व्यवहार करण्यासाठी डेबिट, क्रेडिट, नेट बँकिंग अशा विविध ई-सेवांचा भाव

पुणे : नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता कोणत्याही वस्तूची खरेदी, हॉटेलिंग किंवा इतर व्यवहार करण्यासाठी डेबिट, क्रेडिट, नेट बँकिंग अशा विविध ई-सेवांचा भाव वाढला आहे. व्यवहारात शंभर रुपयांच्या नोटांची चणचण जाणवू लागल्याने अनेक नागरिकांकडून भाजी, दूध खरेदीसाठीदेखील ई-व्यवहाराचा आधार घेतला जात आहे. चलनातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मागील मंगळवारी (दि. ८) घेण्यात आला. त्यामुळे बुधवारपासून रुग्णालये, मेडिकल, पेट्रोल पंप, रेल्वे, विमानाचे तिकीट वगळता इतर व्यवहारांतून या नोटा हद्दपार झाल्या. त्यामुळे पाचशे व हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठी तसेच शंभरच्या नोटा घेण्यासाठी बुधवारपासून बँका, एटीएमबाहेर भल्यामोठ्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. या सोमवारीही शहरातील सुरू असलेल्या एटीएमबाहेर दिसून आल्या. अनेकांना आता दैनंदिन व्यवहारासाठीही सुट्या पैशांची चणचण भासू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता ई-व्यवहारावर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे. तासन् तास रांगेत उभे राहून त्रासून जाण्यापेक्षा डेबिट, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग या पर्यायांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.शहरातील हॉटेलमध्ये जाणाऱ्या ७० ते ८० टक्के खवय्यांकडून डेबिट, क्रेडिट कार्डांचा वापर केला जात आहे. ज्या ग्राहकांकडे कार्ड आणि सुटे पैसेही नाहीत, त्यांना काही हॉटेलचालकांकडून कूपन दिली जात आहेत. कपड्यांच्या बाजारपेठेतही बहुतेक व्यवहार कार्डांवर सुरू आहेत. बहुतेक कपड्यांच्या किंमती ५०० रुपयांपेक्षा अधिक असल्याने ग्राहक पूर्वी ५०० किंवा १००० रुपयांच्या नोटा देत होत्या. आता मात्र, या नोटा स्वीकारल्या जात नाहीत. त्यामुळे नवीन नोटा किंवा सुटे पैसे असलेल्या ग्राहकांसोबतच रोखीने व्यवहार सुरू आहेत. मात्र, हे प्रमाण खूप कमी असून, जवळपास ९० टक्क्यांपेक्षा जास्त खरेदी कार्डांद्वारे केली जात असल्याचे कपडे व्यावसायिकाने सांगितले.