शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ९३ गावांत ‘ई-बँकिंग’

By admin | Updated: March 26, 2015 23:01 IST

शासनाच्या महत्त्वाकांक्षी ई-पंचायत प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात ९३ ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग व्यवहार सुरू असून, आतापर्यंत ८५ हजारांचे व्यवहार झाले आहेत.

पुणे : शासनाच्या महत्त्वाकांक्षी ई-पंचायत प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात ९३ ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग व्यवहार सुरू असून, आतापर्यंत ८५ हजारांचे व्यवहार झाले आहेत. १२0८ खातेदार जोडले गेले आहेत. जनधन योजनेंतर्गत ५ हजार ७८0 जणांची खाती उघडली आहेत. शासनाच्या महत्त्वाकांक्षी ई-पंचायत प्रकल्पाद्वारे सर्व ग्रामपंचायती इंटरनेटने जोडून, सर्व कारभार संगणकीय आणि ‘आॅनलाइन’ करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपूर्वी केंद्र व राज्य शासनाने संयुक्तपणे सुरूकेले. देशातील अडीच लाख ग्रामपंचायती ‘आॅप्टिकल फायबर केबल’ नेटवर्कने जोडण्यासाठी भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड ही कंपनी केंद्र शासनाने सुरु केली. तिच्याद्वारे ग्रामपंचायत स्तरापर्यंत उच्च क्षमता आणि उच्च दर्जाची ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिवीटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड कंपनी यांच्यात त्रिस्तरीय करार १२ एप्रिल २०१३ रोजी करण्यात आला होता. त्यामुळे ई-गव्हर्नन्स आणि ई-पंचायत प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गतिमानता येणार आहे. जिल्ह्यात ६४४ ग्रामपंचायतींमध्ये व्यवहार सुरू करण्याचा प्रयत्न आहे. सप्टेंबर २0१३ पासून केवळ ९३ ग्रापंचायतींत ही सुविधा सुरू करण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात सर्वाधिक १७ तर बारामतीत १६ ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग व्यवहार सुरू आहेत. हवेलीत १५ तर खेडमध्ये १४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. वेल्हे तालुक्यात पक्त एका ग्रामपंचायतीत ही सुविधा सुरू आहे. मावळमध्ये अद्याप एकाही ग्रामपंचायतीत ही व्यवस्था नाही. बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र व स्टेट बँक आॅफ इंडिया या बँकांचा समावेश आहे. ग्रामपंचायतींमध्ये संगणक समन्वयक शासनाने नियुक्त केलेले आहेत. त्यांच्यामार्फत ही खाती चालविली जातात. त्यातून ग्रामपंचायतीला ५० टक्के कमिशन मिळते; तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेलाही कमिशनचा काही हिस्सा मिळतो. (प्रतिनिधी)तालुका सेंटरखातेदारआंबेगाव ४ २१बारामती १६ ४२भोर२ ५२दौैंड२ १९हवेली१५ ३९इंदापूर ३ ३१जुन्नर १७ ४६खेड५७ १४मावळ0 १४मुळशी३ ९पुरंदर६ १४शिरूर१0 ३४वेल्हा१ १४एकूण९३ ४१९सध्या सर्व ठिकाणी ‘इंटरनेट कनेक्टिवीटी’ मिळत नसल्याने जिथे ती आहे, अशा ठिकाणी बँकिंग व्यवहार सुरूकरण्याला प्राधान्य दिले आहे. मात्र भविष्यात ब्रॉडबँडने सर्व ग्रामपंचायती जोडल्यावर सर्वत्र बँकसेवा सुरूकरता येईल,- नितीन माने , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग)