शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

नालासफाईच्या नावाखाली धूळफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST

त्याचबरोबर तक्रार करूनही अद्यापपर्यंत येथील गवत काढून साफसफाई केली गेली नसल्याने पावसाळ्यात या ओढे-नाल्यांतून पाणी वाहण्यास अडचणी येणार आहे. ...

त्याचबरोबर तक्रार करूनही अद्यापपर्यंत येथील गवत काढून साफसफाई केली गेली नसल्याने पावसाळ्यात या ओढे-नाल्यांतून पाणी वाहण्यास अडचणी येणार आहे.

सिंहगड रस्ता परिसरात अनेक ठिकाणी छोटे-मोठे ओढे-नाले आहेत. यातून पावसाळ्यात तर पाणी वाहतेच, पण बाकी काळात ड्रेनेज व सांडपाणीही यात वाहत असते. परिसरात काही ठिकाणी भुयारी ड्रेनेज योजना नसल्याने बहुतांश वसाहतींचा मैला ओढे-नाल्यांतूनच सोडला गेला आहे. अभिरुची मॉल परिसरात असणाऱ्या नाल्यात एवढे गवत वाढले आहे की त्याठिकाणी नाला आहे हे दिसत सुद्धा नाही. मात्र, याबाबत तक्रार करूनही अद्यापपर्यंत महापालिकेने कोणतीच कार्यवाही केली नसल्याचे शिवसेना विभागप्रमुख नीलेश गिरमे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

चौकट:

आयुक्तांसह महापौरांनी केली ओढ्या-नाल्यांची पाहणी... माॅन्सूनपूर्वच्या दृष्टीने गेल्या आठवड्यात महापौर मुरलीधर मोहोळ व आयुक्त विक्रमकुमार यांनी सिंहगड रस्ता परिसरातील ओढ्या-नाल्यांची पाहणी केली. ज्या ठिकाणचा गाळ काढून साफसफाई केली आहे अशाच ठिकाणचा भाग त्यांना क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दाखवला असल्याची चर्चा नागरिकांत आहे.

कोट:

सिंहगड रस्ता परिसरातील ओढे - नाल्यांची व गटरीची साफसफाई होणे गरजेचे आहे, जर वेळेत साफसफाई झाली नाहीतर नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी घुसून आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

- नालेश गिरमे, शिवसेना विभागप्रमुख

-

------

सिंहगड रस्ता परिसरातील सर्व ओढ्या - नाल्यातील गाळ काढण्यात आला आहे. त्याचबरोबर साफसफाई करण्यात आली आहे. संबंधित नाल्याची साफसफाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही गवत वाढले असेल तर तेही काढण्यात येईल.

- देवेंद्र राठोड, कनिष्ठ अभियंता, मलनिस्सारण विभाग

फोटो ओळ: अभिरुची मॉल परिसरात असणाऱ्या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढले असल्याने पुराचा धोका संभवतो आहे. (छायाचित्र : कल्याणराव आवताडे)