शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याभरात पेट्रोलचे दर साडेतीन रुपयांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:14 IST

पुणे : राज्य आणि केंद्र सरकारने पेट्रोलवरील कर कमी करणार, असे सांगितले होते. मात्र, अद्याप याबाबत दोन्हीकडून कोणताही ठोस ...

पुणे : राज्य आणि केंद्र सरकारने पेट्रोलवरील कर कमी करणार, असे सांगितले होते. मात्र, अद्याप याबाबत दोन्हीकडून कोणताही ठोस निर्णय झाला नाही. केंद्र सरकारने काही प्रमाणात डिझेलचे दर कमी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत डिझेल ५० पैशांनी कमी झाले आहे. मात्र, पेट्रोलचे दर वाढतच आहे. महिन्याभरात पेट्रोलचे दर साडेतीन रुपयांनी (३.५८ पैसे) वाढले आहेत.

पुण्यात ४ जुलैला पेट्रोल साधे १०३.८७, पॉवर १०७.५५ रुपये, तर डिझेल प्रतिलिटर ९४.३४ रुपये होते. तर, २० ऑगस्ट रोजी पेट्रोल साधे १०७.४५, पॉवर १११.१३ रुपये, तर डिझेल प्रतिलिटर ९४.९९ रुपयांपर्यंत गेले आहेत. म्हणजे साधारण एक महिन्यात ३.५८ रुपयांनी पेट्रोलचे दर वाढले आहेत. आधीच वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यातच आता दररोज पेट्रोल दरवाढीमुळे नोकरदार, सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे.

------

...हे कर कमी केले तर पेट्रोलचे दर कमी होतील

राज्य सरकार स्वच्छता, शिक्षण, दारूबंदी आणि सेस यावर साधारणतः १० रुपये कर आकारत आहे. तो कमी करणे अपेक्षित आहे, असे जाणकारांचे मत आहे. सध्या राज्य सरकार पेट्रोलवर ३४-३६, तर केंद्र सरकार ३०-३२ रुपये कर आकारत आहे. याबाबत दोन्ही पातळीवरून कर कमी करण्यासंदर्भात सूतोवाच करण्यात आले आहेत. मात्र, त्याबाबत मागील महिनाभरात दोन्ही सरकारनी कोणताही निर्णय घेतला नाही. पुण्यात मागील महिनाभरात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी ३.५८ रुपयांनी वाढले आहे.

----

पेट्रोल-डिझेलचे प्रतिलिटर भाव

दिनांक साधे पेट्रोल पॉवर डिझेल

४ जुलै १०३.८७ १०७.५५ ९४.३४

१५ जुलै १०७.१६ ११०.८४ ९५.६०

२० ऑगस्ट १०७.४५ १११.१३ ९४.९९