शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात ‘१०८’ रुग्णवाहिका ठरली ४६ हजार रुग्णांसाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना रुग्णांसाठी शासनाची १०८ या रुग्णवाहिकेची सुविधा खऱ्या अर्थाने वरदान ठरली. याशिवाय जिल्हा परिषदेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना रुग्णांसाठी शासनाची १०८ या रुग्णवाहिकेची सुविधा खऱ्या अर्थाने वरदान ठरली. याशिवाय जिल्हा परिषदेच्या १०२ रुग्णवाहिका तर २४ तास कोरोना रुग्णांच्या सेवेत दाखल आहेत. यामुळे किमान ग्रामीण भागात तरी रुग्णवाहिका मिळाली नाही म्हणून एखाद्या रुग्णावर जीव गमावण्याची वेळ आली नाही. गेल्या नऊ महिन्याच्या कोरोना काळात जिल्ह्यात तब्बल 46 हजार 586 रुग्णांना जीवदान दिले. यात 19 हजार कोरोना रुग्ण होते.

जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात कोरोना काळात तब्बल 226 सरकारी रुग्णवाहिका कार्यरत होत्या.या 108 च्या 82 रुग्णवाहिका असून, यातील 31 रुग्णवाहिका कोरोनासाठी राखीव ठेवण्यात आल्यात. तर जिल्हा परिषदेच्या 102 सुविधेच्या 92 रुग्णवाहिका आणि खाजगी 52 रुग्णवाहिका अधिग्रहीत करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात सर्व कोविड केअर सेंटरमध्ये या रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यात गंभीर होणा-या प्रत्येक कोरोना रुग्णाला सरकाली रुग्णवाहिके मार्फतच पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरातील कोरोना हाॅस्पिटलमध्ये येऊन येतात. यामुळेच ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी या सरकारी रुग्णवाहिका 24 तास उपलब्ध आहेत.

-------

- जिल्ह्यात 108 च्या रुग्णवाहिका : 82

- 108 च्या रुग्णवाहिका चालक : १७०

- 108 च्या रुग्णवाहिका डॉक्टर्स : २०७

--------

कोरोनासाठी 108 सुसज्ज

कोरोनाच्या काळात डॉक्टर, चालक यांना कोरोना रुग्ण हाताळणीचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले व त्यांना पी पी ई कीट हॅण्ड सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्स,मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिली. रुग्णवाहिका निर्जंतुकीकरण प्रशिक्षण व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रत्येक कोरोना बाधित किव्हा संशयाती रुग्ण हाताळल्या नंतर रुग्णवाहिकेचे निर्जंतुकीकरण करून पुढील रुग्ण हाताळायला तयार केली जाते.

----

सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिका रुग्ण सेवेसाठी तत्पर

पुणे जिल्या मध्ये एकूण ८२ रुग्णवाहिका असून, त्यापैकी २४ रुग्णवाहिका (ALS) व ५८ रुग्णवाहिका (BLS) आहेत कोरोना काळामध्ये अति गंभीर झालेल्या रुग्णांना, व्हेंटिलेटर सपोर्ट व ऑक्सिजन वर असणाऱ्या रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेमुळे जीवनदान मिळाले आहे. रुग्नावाहीकेवर डॉक्टर असल्यामुळे त्वरित रुग्णांवर उपचार सुरु करून हॉस्पिटलला अडमिट केले जाते.

- विठ्ठल बोडखे, विभागीय व्यवस्थापक १०८ रूग्णवाहिका

-------

... अन् गंभीर रुग्णाला जीवदान मिळाले

मला १०८ कंट्रोल रूम वरून रात्री ३.१० वा. फोन आला. एक रुग्ण अतिशय गंभीर असून, त्याला पुढील उपचार साठी हॉस्पीटला पाठवायचे आहे. आम्ही १० मिनिटात पोहोचलो १०८ रुग्नावाहीकेवरील डॉक्टर सुनील वायदंडे यांनी रुग्णांना बघितले ती रुग्ण अतिशय गंभीर अवस्तेत होती. तिला व्हेंटिलेटर सपोर्ट व ऑक्सिजन लागणार होता. त्या रुग्णाला व्हेंटिलेटर सपोर्ट व ऑक्सिजन देऊन उपचार करत रुग्णालयात दाखल केले व त्या रुग्णाचा जीव वाचला.

- सुनील जाधव, चालक, येरवडा पुणे