शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

वानवडीत महिलांचा दुर्गावतार

By admin | Updated: May 5, 2017 03:09 IST

रामटेकडी येथे अनेक दिवसांपासून छेड काढणाऱ्या राकेश ऊर्फ फौजी डिंग्या याला महिलांनी चांगलाच चोप दिला. या महिलांनी

हडपसर : रामटेकडी येथे अनेक दिवसांपासून छेड काढणाऱ्या राकेश ऊर्फ फौजी डिंग्या याला महिलांनी चांगलाच चोप दिला. या महिलांनी केलेल्या मारहाणीत डिंग्या जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार घेत आहे. डिंग्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.याबाबत रामटेकडी येथील एका ५५ वर्षीय महिलेने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ या महिलेच्या शेजारी राहणारा डिंग्या हा कायमच महिलांची छेडछाड काढत होता. ही महिला व तिच्या ५ सुना व इतर महिला बुधवारी रात्री ९ वाजता पाणी भरण्यासाठी नळकोंडाळ्यावर पाणी येण्याची वाट पाहात होत्या़ त्यावेळी डिंग्या त्यांच्यासमोर आला  व त्याने लज्जा उत्पन्न होईल,  असे अश्लील चाळे करण्यास  सुरुवात केली़ त्यावर या महिलांनी त्याला खडसावताच त्यांना तो शिव्या देऊ लागला. त्यावेळी सर्व महिलांनी त्याला धरा, असा आरडाओरडा करताच तो त्या महिलेवर धावून आला. या महिलेच्या अंगावर धावून जात असल्याचे पाहून चिडलेल्या इतर महिलांनी त्याला पकडले़ एका महिलेने चुलीसाठी घराबाहेर  ठेवलेले लाकूड आणून त्याने त्याला चोप दिला़ त्यामध्ये तो जखमी  झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले़  डिंग्या हा कॅन्टोन्मेंट बोर्डात सफाई कामगार म्हणून काम करतो. या आधीही त्याच्या विरोधात महिलांनी तक्रारी केल्या होत्या़ पण, त्यावर काहीही कारवाई झाली नव्हती़ या भागात पाणी रात्री उशीरा येत असल्याने महिला सार्वजनिक नळकोंडाळ्यावर पाणी भरण्यासाठी, कपडे धुण्यासाठी उशिरापर्यंत थांबलेल्या असतात़ त्याचा गैरफायदा घेऊन तो अश्लील चाळे करीत असे. त्यामुळे रामटेकडी परिसरातील महिला या त्रासाला कंटाळल्या होत्या. त्याच्या अशा कृत्याला वैतागूनच परिसरातील महिलांनी त्याला बेदम चोप दिला. त्यात तो जखमी झाला असून ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे़