शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नृृत्यांगनेची कलेला शिक्षणाची जोड

By admin | Updated: January 3, 2017 06:32 IST

वयाच्या सातव्या वर्षापासून यमुनाबाई वाईकर, मधू कांबीकर यांसह नामांकित कलाकारांकडून नृत्यकलेचे धडे घेतले. देशभरात लावणी नृत्याचे सादरीकरण करून

पुणे : वयाच्या सातव्या वर्षापासून यमुनाबाई वाईकर, मधू कांबीकर यांसह नामांकित कलाकारांकडून नृत्यकलेचे धडे घेतले. देशभरात लावणी नृत्याचे सादरीकरण करून अनेक पारितोषिके व पुरस्कार पटकावले. मात्र, केवळ नृत्यकलेत निष्णात न राहता उच्च शिक्षण घेऊन त्याला ज्ञानाची जोड द्यावी, या हेतूने तिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रवेश घेतला. आता ‘गझलनृत्य’ सादर करून ती गझलप्रेमी रसिकांसाठी एक वेगळीच पर्वणी घेऊन येणार आहे. रेश्मा मुसळे असे या नृत्यांगनेचे नाव आहे. नृत्यकलेचा वारसा त्यांना आपल्या आजी व आईकडूनच मिळाला. बालपणापासून तिने लावणी नृत्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गोविंदराव निकम यांच्याकडून कथक नृत्याचेही धडे घेतले. केवळ कलेचे शिक्षण घेऊन उपयोग नाही. त्याला शिक्षणाची जोड देण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांनी बहि:स्थ पद्धतीने मराठी विषयातील पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. जगभरात नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा निश्चिय केला. त्यासाठी दोन वर्ष प्रवेशासाठी प्रतीक्षा केली. यंदा त्यांना एम. ए. अभ्यासक्रमास प्रवेश मिळाला आहे.पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून तिला लोककलेत पीएच. डी. करायची आहे. केवळ प्रात्यक्षिकावर अवलंबून न राहता त्याला अभ्यासाची जोड देण्यासाठी रीतसर शिक्षण घ्यायचे आहे. आपण घेतलेल्या कलेचे प्रशिक्षण इतरांनाही मिळावे, या उद्देशाने लावणीचे प्रशिक्षण देणारी एक संस्था सुरू करण्याचे प्रयत्न तिने सुरू केले आहेत. मराठी विभागातील विविध उपक्रमात ती उत्स्फूर्तपणे सहभाग घेते. विभागातर्फे येत्या १२ व १३ जानेवारी रोजी गझल विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ती ‘गझलनृत्य’ सादर करणार आहेत. गझलनृत्य हा नवीन नृत्य प्रकार आहे. त्यामुळे विविध चित्रपटात ठुमरीवर सादर केलेले नृत्याविष्कार सादर करणार असल्याचे रेश्मा मुसळे यांनी सांगितले. सांगितले.