शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

विठूनामाच्या गजराने दुमदुमली दौंडनगरी

By admin | Updated: July 5, 2017 02:49 IST

विठू नामाचा गजर... भगव्या पताका... तसेच आषाढी सोहळ्यानिमित्त शहरात दाखल झालेल्या हजारो वारकरी भक्तांमुळे संपूर्ण दौंडनगरी

लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : विठू नामाचा गजर... भगव्या पताका... तसेच आषाढी सोहळ्यानिमित्त शहरात दाखल झालेल्या हजारो वारकरी भक्तांमुळे संपूर्ण दौंडनगरी भक्तिमय वातावरणात न्हाहून निघाली. भीमेच्या पात्रात स्नान करून आषाढी एकादशीनिमित्त राही रुक्मिणीचे दर्शन घेतले. तर डॉ. हेडगेवार स्मृती समितीच्या वतीने परंपरेनुसार घेण्यात आलेल्या शालेय दिंडीत स्पर्धांमुळे शहरात एक आगळेवेगळे धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. ठिकठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या ध्वनीफिती टाळमुदंग आणि ज्ञानोबा तुकाराम माऊली या जयघोषाने अवघा परिसर भक्तीमय झाला होता. वारकरीदेखील पालखी सोहळ्यात बेफाम नाचत होते. विठ्ठल मंदिराच्या परिसरात सुशोभीत रांगोळ्या काढून तोरण पताका लावण्यात आल्या होत्या. पहाटे अ‍ॅड. सुधीर गटणे आणि परिवाराच्या वतीने विठ्ठल मंदिरात पौराहित्य करण्यात आले. पहाटेपासूनच भाविकांच्या विठ्ठल दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. येथील रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ प्रथेप्रमाणे पंचक्रोशीतील १४ ग्रामदैवतांच्या पालख्यांचे आगमन झाले. या वेळी गावचे पाटील तथा माजी आमदार बाळासाहेब जगदाळे पाटील, इंद्रजित जगदाळे पाटील यांनी स्वागत केले तर नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीजळ नगराध्यक्षा शीतल कटारिया यांनी पालखींचे स्वागत केले. अग्रभागी मानाची कुरकुंभ येथील फिरंगाई देवीची पालखी होती. त्यानंतर भैरवनाथ (गिरीम), म्हस्कोबा (गोपाळवाडी), भैरवनाथ (जिरेगाव), भैरवनाथ (मळद), म्हसोबा (माळवाडी), म्हसनोबा (म्हसनेरवाडी), बिरोबा (येडेवाडी), सिरसाई (शिर्सुफळ), भैरवनाथ (पांढरेवाडी), भैरवनाथ (मेरगळवाडी), भैरवनाथ (वाघदरा), भैरवनाथ (कौठडी), भोळाबा (भोळाबावाडी). या पालख्यांचे वाजत गाजत सकाळी ११ वाजता दौंडनगरीत आगमन झाले. शहरातील मुख्य रस्त्यावर सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी पालख्यांचे स्वागत करून अल्पोहार तसेच पाणीवाटप केले. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. मजलदरमजल करीत १४ ग्रामदैवतांच्या पालख्या भीमा नदीवर देवांना स्नान घालण्यासाठी आल्या. सर्वप्रथम ग्रामदैवतांच्या आरत्या झाल्या. त्यानंतर ग्रामदैवतांनाभीमेचे पात्र स्नान घालण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. त्यानंतर गाववेशीतून या पालख्या विठ्ठल मंदिराच्या पसिरात विसाव्याला गेल्या. याठिकाणी रामेश्वर मंत्री आणि मंत्री परिवाराच्या वतीने भव्य मंडप परंपरेनुसार वारकऱ्यांसाठी उभारला होता. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक : शालेय दिंडी स्पर्धेचा निकाल ४दौंड शहरात पंचक्रोशीतील १४ ग्रामदैवतांच्या दिंड्या आल्यानंतर येथील गांधी चौकात मुस्लिम बांधवांनी वारकरी भक्तांना अल्पोहार आणि फराळाचे वाटप केले. मुस्लिम बांधवांकडून वारकरी भक्तांना अल्पोहारासाठी होणाऱ्या आग्रहामुळे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक पंरपरेनुसार होते. डॉ. हेडगेवार स्मृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय शिणोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली परंपरेनुसार चार गटात शालेय दिंडी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. शहरातील मुख्य रस्त्यावरुन सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक प्रबोधन करीत या शालेय दिंड्यांमुळे दौंड नगरी गजबजली होती. दिंडी स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे...लहान गट : गीताबाई बंब शाळा (प्रथम), शिशूविकास मंदिर (द्वितीय), क्रांतीज्योती सरस्वती विद्यालय (तृतीय). शिशुगट : ब्लॉसम नर्सरी (प्रथम), रत्नदीप बालकमंदिर (द्वितीय), सरस्वती बालक मंदिर (तृतीय). मध्यम गट : शिशूविकास मंदिर (प्रथम), श्रीमती शांताबाई ठोंबरे विद्यालय (द्वितीय), शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय (तृतीय), मोठा गट : विठाबाई चव्हाण कन्या विद्यालय (प्रथम), तुकडोजी विद्यालय (द्वितीय), लाजवंती गॅरेला (तृतीय).