शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मैलाशुद्धीकरण केंद्रातील टाकीत स्फोट

By admin | Updated: April 5, 2016 00:50 IST

भाटनगर येथील मैलाशुद्धीकरण केंद्रातील टाकीत गॅसमुळे स्फोट झाल्याने टाकीचा स्लॅब कोसळला. ही घटना सोमवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली.

पिंपरी : भाटनगर येथील मैलाशुद्धीकरण केंद्रातील टाकीत गॅसमुळे स्फोट झाल्याने टाकीचा स्लॅब कोसळला. ही घटना सोमवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली. स्फोटाचा आवाज झाल्याने परिसरात घबराट पसरली. दुपारच्या सुमारास अचानक स्फोटासारखा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अनेक नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. कर्मचाऱ्यांचीही धांदल उडाली. काही वेळानंतर हा स्फोट टाकीतील स्फोटामुळे झाल्याचे समोर आले. तसेच छताचा स्लॅब कोसळून टाकी उघडी झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी धाव घेतली. महापालिकेच्या वतीने भाटनगर येथे उभारण्यात आलेले हे मैलाशुद्धीकरण केंद्र ३ एप्रिल २००१ ला सुरू करण्यात आले. प्रकल्प ३० एमएलडी क्षमतेचा आहे. येथील केंद्रात मैलाशुद्धीकरणाच्या टाक्या असून, त्यामध्ये गॅस तयार होतो. या टाक्यांवर सिमेंटच्या स्लॅबचा छत आहे. यापूर्वी टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस तयार होत नव्हता. तसेच स्लॅब काही ठिकाणी लिकेज असल्याने गॅस बाहेर पडत होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या टाक्यांमध्ये गॅसनिर्मितीसाठी नवीन मिक्सर बसविण्यात आल्याने सध्या गॅस तयार होण्याचे प्रमाण वाढले आहे. तयार होणारा गॅस बाहेर सोडण्यासाठी असलेली यंत्रणा कमकुवत असल्याने हा गॅस टाकीतच राहिला. दरम्यान, सोमवारी दुपारी उन्हाचेही प्रमाण अधिक असल्याने टाकीत स्फोट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भाटनगरसह चिखली व कासारवाडी येथेही अशा प्रकारचे पंधरा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले मैलाशुद्धीकरण केंद्र आहेत. या केंद्रातील टाक्यांचेही छत सिमेंटच्या स्लॅबचे असून, हे स्लॅब जीर्ण झाले आहेत. तर नव्याने उभारण्यात येणाऱ्या टाक्यांचे छत रबरचे बनविण्यात आले आहे. त्यामुळे गॅसचे प्रमाण कमी-अधिक झाल्यास रबरच्या छताची उंची त्या प्रमाणात कमी-जास्त होत असल्याने ताण येत नाही.(प्रतिनिधी)