शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मार्केट यार्डात डमी अडत्यांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:14 IST

४ ते ८ डमी अडते : शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळतोय कमी भाव

पुणे : गुलटेकडी येथील मार्केट यार्डामधील अडत्यांची संघटना असणाºया अडते असोसिएशनच्या पदाधिकाºयांच्या गाळ्यांवरच डमी अडत्यांची संख्या वाढली आहे. मार्केट यार्डातील फळबाजार आणि तरकारी विभागातील काही अपवाद वगळता अनेक गाळ्यांवर डमी आडत्यांची संख्या पुन्हा वाढली आहे. एकाच गाळ्यावर सुमारे ४ ते ८ डमी अडते असल्याचे दिसून येत आहेत. डमी अडत्यांमुळे शेतकºयांच्या शेतमालाला कमी भाव मिळत असून शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. परंतु, बाजार समितीकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

अडते असोसिएशनच्या झालेल्या एका सर्वसाधारण सभेतही दोनच मदतनीस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, संघटनेच्या पदाधिकाºयांच्या गाळ्यावरच डमींची संख्या वाढली आहे. गुलटेकडी मार्केट यार्डात फुले, फळे, तरकारी विभागात कृषी उत्पन्न बाजार समितीने एका गाळ्यावर दोन डमी अडत्यांना ‘मदतनीस’या नावाखाली बेकायदा परवानगी दिली आहे.

तसेच मागील वर्षी बाजारातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी नवीन नियमावली तयार केली होती.त्यानुसार बाजाराच्या वेळा, डमी अडत्यांची संख्या आदी नियम घालून दिले. त्यानुसार काही काळ या नियमांची अंमलबजावणी करण्यात आली. तसेच काही डमी अडत्यांवर कारवाई करण्यात आली.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून डमी अडत्यांची संख्या पुन्हा वाढली आहे. मार्केट यार्डात गाळ्यासमोर पंधरा फुटांपर्यंतच शेतमाल विक्रीस परवानगी आहे.परंतु, डमी अडते गाळ्याच्यासमोर शेतमाल विक्रीसाठी बसतात. त्यामुळे बाजारात शेतमालाची वाहतूक करणाºया वाहनांना वाहतूककोंडीचा त्रास सहनकरावा लागतो, तर डमी अडते गाळेधारक अडतदाराकडून शेतमाल विकत घेऊन चढ्या दराने विकतात. त्यामुळे शेतकºयाच्या शेतमालास कमीभाव मिळत आहे, असे दिसून येत आहे.