लोणावळा : पारंपरिक वाद्य व ढोल-ताशाचा गजऱ़़ बॅण्ड़़. तुताऱ्यांचा आवाज़़़ गुलालाची मुक्त उधळण व आई आयलो़़़ आई माऊलीचा उदं उदं़़़ च्या गजराने एकवीरा देवीचा कार्ला गड गुरुवारी अक्षरश: दुमदुमून गेला होता़महाराष्ट्राची कुलस्वामिनी व आराध्यदैवत असलेल्या आई एकवीरेचा पालखी सोहळा गडावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला़ लाखो भाविकांनी गडावर देवीचे व पालखीचे दर्शन घेतले़ दुपारपर्यंत कार्ला गडावर भाविकांची संख्या कमी होती. मात्र पालखी मिरवणुकीला काही तास उरलेले असताना भाविकांनी गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने सायंकाळी ६ वाजता गडावर अक्षरश: पाय ठेवण्यास जागा उरली नव्हती़ दुपारी १२ वाजता देवीची चांदीची पालखी गडावर दाखल झाली़ अध्यक्ष अनंत तरे व विश्वस्त यांच्यासह पालखीचे मानकरी असलेले चौलचे आग्रावकर यांनी पालखीला खांदा लावला. या वेळी हजारो भाविकांनी आई एकवीरेचा जयघोष करत दर्शनाचा लाभ घेतला़ गुढीपाडव्यापासून देवीच्या चैत्री यात्रेला सुरुवात झाली़ यात्रेच्या मुख्य दिवशी गुरुवारी सायंकाळी सप्तमीचा पालखी सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ या उक्तीप्रमाणे पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गडावर गर्दी केली होती़ मागील दोन दिवसांपासून गडावर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या़ कोकण परिसरातून आलेल्या देवीच्या शेकडो पालख्या, भक्तीत तल्लीन होऊन नाचणारे भाविक व बँडच्या आवाजात ‘आई माऊलीचा उदं़़.उदं’चा गजर यामुळे परिसर दुमदुमला होता़रीतीरिवाजाप्रमाणे पहाटे मंदिरात देवीचा अभिषेक करत पूजा व आरती करण्यात आली़ दुपारी ट्रस्टचे अध्यक्ष तरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली़ उपाध्यक्ष मदन भोई, सचिव संजय गोविलकर, खजिनदार नवनाथ देशमुख, काळुराम देशमुख, विजय देशमुख, विलास कुटे, पार्वती पडवळ आदींसह पालखीचे मानकरी असलेले चौल आग्रावकर, पेणचे वास्कर उपस्थित होते़या व्यतिरिक्त गडावर कोठेही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला नव्हता. तसेच जिल्हा प्रशासनाकडूनदेखील गडावर सांगितल्याप्रमाणे काहीही सुविधा या वर्षी करण्यात आलेली नसतानादेखील अतिशय शांततेमध्ये देवीचा मानाचा मुख्य दिवस व पाखली सोहळा गडावर पार पडला़मागील तीन दिवसांपासून सर्वत्र दारूबंदी लागू करण्यात आली आहे़ तसेच, वरसोली टोलनाका व कार्ला फ ाटा येथे चेकनाके उभारत वाहनांची तपासणी मोहीम पोलीस यंत्रणेकडून राबवण्यात आली़ (वार्ताहर)४ भाविकांना पालखी सोहळ्याचे दर्शन गड चढताना, तसेच रांगेत व्हावे याकरिता देवस्थानच्या वतीने जागोजागी क्लोज सर्किट टीव्ही व एलईडी लावण्यात आले होते़ ४ जागोजागी व रांगेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय, विजेची व्यवस्था, २४ तास दर्शनाची सोय, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती़४ गडावर चढताना व उतरताना कसलाही गैरप्रकार घडू नये यासाठी रेलिंगची सोय करण्यात आली होती़
एकवीरेच्या नामघोषाने दुमदुमला कार्ला गड
By admin | Updated: March 26, 2015 23:07 IST