शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शहरात विधिवत घटस्थापना

By admin | Updated: October 2, 2016 05:47 IST

सनई-चौघड्याचे सूर... मंत्रोच्चारांचा घोष... अशा मंगलमय वातावरणात शहरात सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. शहर व उपनगरांतील देवी मंदिरे

पुणे : सनई-चौघड्याचे सूर... मंत्रोच्चारांचा घोष... अशा मंगलमय वातावरणात शहरात सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. शहर व उपनगरांतील देवी मंदिरे तसेच घरोघरी विधिवत घटस्थापना करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहरातील देवी मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.शहरातील सर्व देवी मंदिरांमध्ये विधिवत घटस्थापना करण्यात आली. बहुतेक देवी मंदिरे विद्युतरोषणाईने उजळून निघाली आहेत. शहरातील तांबडी जोगेश्वरी, चतु:शृंगी, महालक्ष्मी, भवानीमाता, वनदेवी, तळजाई, वाघजाई, शीतळादेवी अशा विविध मंदिरांमध्ये उत्साहात घटस्थापना करण्यात आली. सार्वजनिक मंडळांनी देवीच्या मूर्ती मिरवणूक काढून उत्सव मंडपात घटस्थापना केली. त्यामुळे शहरात सर्वत्र मंगलमय वातावरण होते.श्री देवी चतु:शृंगी मंदिरात अभिषेक, श्रीसूक्त, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण या कार्यक्रमांनंतर विधिवत घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर देवीची महाआरती झाली. उत्सव काळात मंदिर २४ तास खुले राहणार आहे. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात पीएन गाडगीळ ज्वेलर्सचे मालक सौरभ गाडगीळ व राधिका गाडगीळ यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. या वेळी प्राप्तिकर विभागाचे आयुक्त डी. एम. बेणुपानी, मंदिराचे विश्वस्त भरत अगरवाल, तृप्ती अगरवाल, अ‍ॅड. प्रताप परदेशी, रमेश पाटोदिया, हेमंत अर्नाळकर, मुरली चौधरी, नारायण काबरा, राजेश साकला, शिवा मंत्री आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)नवरात्र महोत्सवाचे उद्घाटनआदिशक्तीला वंदन करणाऱ्या आणि कला, संस्कृती, नृत्य, गायन, वादन यांचा संगम असणाऱ्या नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी वनमंत्री डॉ.पतंगराव कदम, माजी संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, गटनेते पक्षनेते अरविंद शिंदे, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, पी. ए. इनामदार, अंकुश काकडे, पुणे महोत्सवाचे संयोजक व माजी उपमहापौर आबा बागुल, जयश्री बागुल, अभिनेत्री वंदना गुप्ते, सोनाली कुलकर्णी, श्वेता शिंदे, भार्गवी चिरमुले, गिरिजा जोशी, राधा सागर, गौरी नलावडे आदी उपस्थित होते.मंदिराला फुलांची सजावटशिवदर्शन येथील श्रीलक्ष्मी मंदिरात सकाळी सव्वाआठ वाजता माजी उपमहापौर आबा बागुल व जयश्री बागुल यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. नवरात्रोत्सवानिमित्त या मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच, संपूर्ण मंदिर फुलांनी सजविण्यात आले आहे. शहरातील सर्वच मंदिरांमध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या दिवसभर रांगा लागल्या होत्या. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व मंदिरांमध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.