शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
5
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
6
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
7
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
8
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
9
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
10
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
11
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
12
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
13
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
14
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
15
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
16
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
17
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
18
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
19
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
20
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?

महापौरांच्या प्रभागातच खोदाई

By admin | Updated: April 5, 2016 01:00 IST

रस्ते खोदाई थांबवण्याच्या महापौरांच्या आदेशाला प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्याच, वर आता थेट त्यांच्याच प्रभागातील नव्या रस्त्याच्या खोदाईला परवानगी देत

पुणे: रस्ते खोदाई थांबवण्याच्या महापौरांच्या आदेशाला प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्याच, वर आता थेट त्यांच्याच प्रभागातील नव्या रस्त्याच्या खोदाईला परवानगी देत त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला. त्यामुुळेच महापौरांनी नागरिक तसेच स्वयंसेवी संस्था, संघटनांनीच रस्ते खोदाईचे काम थांबवण्याची चळवळ सुरू करावी, असे जाहीर आवाहन केले.महापौर प्रशांत जगताप यांनी सर्वसाधारण सभेत प्रशासनाला रस्ते खोदाईची सर्व कामे थांबवण्याचे आवाहन केले होते. त्याकडे दुर्लक्ष करीत प्रशासनाने एकाही कंपनीला तसा आदेश दिला नाही. त्यामुळे शहरातील रस्त खोदाई सुरूच राहिली. त्यावर संतापलेल्या महापौरांनी आयुक्त कुणाल कुमार तसेच पथ विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत यांना धारेवर धरीत ते कोणाच्या दबावाखाली काम करीत आहेत अशी विचारणा केली होती. तरीही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. आता तर त्यांनी थेट महापौरांच्याच प्रभागातील २९ मार्चला काम पूर्ण झालेले नवे कोरे रस्ते खोदण्याचा आदेश एका कंपनीला दिला आहे. सोमवारी सकाळी प्रभागात फिरताना महापौरांना हे रस्ते खोदलेले आढळले व त्यांच्या संतापाचा पारा चढला.आयुक्त कुणाल कुमार तसेच पथ विभागाचे राऊत यांच्याकडे त्यांनी याबाबत विचारणा केली. त्यावर त्यांनी खासगी कंपन्यांचा त्यांच्या केबल टाकण्यासाठी रस्ते खोदण्याची परवानगी देण्यातून २६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याचा युक्तिवाद केला. ३० मेपर्यंत रस्ते खोदाईची सर्व कामे संपतील असे आयुक्तांनी सांगितले. पत्रकारांशी बोलताना महापौरांनी याचा समाचार घेतला. अशी कामे २८ फेब्रुवारीलाच संपणे अपेक्षित आहे. ती ३१ मार्चपर्यंत लांबवण्यात आली. आता पुन्हा ३० मे असे सांगण्यात येत आहे.