शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारच्या कामांमुळे या वर्षी टँकर झाले कमी

By admin | Updated: May 11, 2017 04:20 IST

दौंडच्या जिरायत पट्ट्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे होऊन साधारणत: २८५८ टीसीएम पाणीसाठा वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदौंड : दौंडच्या जिरायत पट्ट्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे होऊन साधारणत: २८५८ टीसीएम पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे तालुक्यात ऐन उन्हाळ्यात टँकरची संख्या घटली आहे. गेल्या उन्हाळ्यात तालुक्यात २८ टँकर सुरू होते. त्यातुलनेत उन्हाळा संपण्याच्या मार्गावर असताना तालुक्यात ३ टँकर सुरू असून ४ गावांसाठी ४ टँकरचा प्रस्ताव आहे. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटी साधारणत: ७ टँकर वाढतील, अशी स्थिती आहे. परिणामी, १८ टँकरची संख्या घटलेली आहे. पडवी, खोर, कुसेगाव या परिसरात सातत्याने टँकर सुरू असायचे; मात्र सध्याच्या परिस्थितीत या गावांना टँकरने पाणीपुरवठा नाही. खडकवासला कॅनॉलवरून ३३ गावांना पाणीपुरवठा होतो, तर भीमा नदीकाठावरच्या ९ गावांना पाणीपुरवठा नदीपात्रातून होतो. त्यामुळे नदीपात्र आणि खडकवासला कॅनॉलला पाणी असल्यामुळे पाणीटंचाई भासत नाही. जिरायत पट्ट्यात काही भागात जलयुक्त शिवाराची कामे होऊनदेखील टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत काही तलाव, ओढे, कोरडे ठणठणीत आहेत. कौठडी, ताम्हाणवाडी येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. वासुंदे, हिंगणीगाडा, स्वामी चिंचोली या ठिकाणी टँकरची मागणी वाढली आहे. तर, अन्य काही गावांसह वाड्यावस्त्यांवर टँकरची गरज भासेल, असे एकंदरीत चित्र आहे.तेव्हा जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नालाखोदाई, तलाव साफसफाई, चाऱ्या खोदणे इत्यादी कामे झाली असली, तरी ही योजना निसर्गावर अवलंबून असल्याने पाऊस पडला, तरच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाणी आडवा मोहीम यशस्वी होऊ शकते. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत चांगली कामे झाली, हे नाकारून चालणार नाही. परिणामी, या योजनेअंतर्गत वाढलेल्या पाणीसाठ्याचा उपयोग काही जिरायत भागात पिण्यासाठी आणि शेतीसाठी झालेला आहे. २०१५-१६ वर्षांत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नाला, बंधारा खोदाई, नाला साफसफाई, गाळ काढणे इत्यादी कामे झाली आहेत. ही कामे विशेषत: रोटी, वासुंदे, हिंगणीगाडा, कुसेगाव, कौठडी, खडकी, नंदादेवी, पांढरेवाडी, स्वामी चिंचोली, जिरेगाव, देऊळगावगाडा, वाखारी, खोर, पडवी, यवत, डाळिंब, ताम्हाणवाडी, दापोडी या गावात झालेली आहेत. पावसाचे पाणी बऱ्यापैकी साठवले गेले होते. मात्र, मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा जमिनीत मुरल्याने काही जिरायती गावांत पाण्याची टंचाई आहे. येणारा पावसाळा जोरदार झाल्यास जमिनीत पाणी मुरण्याचा प्रकार राहणार नाही. परिणामी ओढे, नाले, तलाव यांत पाण्याचा साठा बऱ्यापैकी राहील. त्यानुसार पाणीटंचाईवर मात करता येईल.