शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

थकीत पाणीपट्टीमुळे १४ गावांचे पाणी बंद

By admin | Updated: February 11, 2016 03:05 IST

येथील उदमाई संयुक्त पाणीपुरवठा व देखभाल समितीच्या साठवण तलावातून १४ गावांतील वाड्यावस्त्यांना केला जाणारा पाणीपुरवठा थकीत पाणीपट्टीमुळे बंद

कुरवली : उद्धट (ता. इंदापूर) येथील उदमाई संयुक्त पाणीपुरवठा व देखभाल समितीच्या साठवण तलावातून १४ गावांतील वाड्यावस्त्यांना केला जाणारा पाणीपुरवठा थकीत पाणीपट्टीमुळे बंद आहे. त्यामुळे गेल्या सात दिवसांपासून ही गावे पाण्याअभावी तहानलेली आहेत.या ठिकाणाहून कुरवली, तावशी, उदमाईवाडी, घोलपवाडी, उद्घट, जांब, चिखली, पवारवाडी, थोरातवाडी, मानकरवाडी या गावांसह वाड्यावस्तींना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या भागातील ग्रामपंचायतकडे लाखो रुपये थकीत पाणीपट्टी आहे. त्यामुळे सात दिवसांपासून पाणीपुरवठा बंद केल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी धावपळ सुरू आहे.संबंधित गावातील ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकांनी सांगितले की, थकीत बिलापैकी काही रक्कम जमा केली आहे. थकीत बिले लवकर भरण्याची हमी देऊन पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, त्याबाबत समितीने नकार दिला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव माने यांनी पाणीपुरवठा समिती हिशोबाच्या गोंधळाबाबत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागविली आहे.देखभाल समितीविरोधात त्यांनी एल्गार पुकारला आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना माने यांनी सांगितले की, या पाणीपुरवठा योजनेत अनेक त्रुटी आहे. आर्थिक बाबतीत सावळा गोंधळ आहे. मुख्य लाईनवर ठिकठिकाणी मनमानी पद्धतीने नळजोड दिले आहेत. त्यांच्या पाणीपट्टी वसुलीबाबतीत तसेच ग्रामपंचायत यांना पाणीबिले आकारण्यात आली आहेत. त्यामध्ये देखील गैरव्यवहार झाल्याची तक्रार आहे. वसुलीबाबतीतही मोठा गैरव्यवहार झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे.(वार्ताहर)