शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गाव कारभाऱ्यांमुळे तोंडचे पाणी पळाले

By admin | Updated: January 11, 2016 01:35 IST

करंदी खे.बा. (ता. भोर) येथे पाणीपुरवठा योजनेसाठीे ४९ लाख खर्च करून गावचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात गावाला यश आले

कापूरव्होळ : करंदी खे.बा. (ता. भोर) येथे पाणीपुरवठा योजनेसाठीे ४९ लाख खर्च करून गावचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात गावाला यश आले. पण, करंदी खेबाच्या पाणीपुरवठा खात्यावर रक्कम शिल्लक नसल्याने गेल्या चार महिन्यांपासून वीजबिलाचा भरणा झालेला नाही. त्यामुळे व पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा पगार न झाल्यामुळे गावचा सार्वजनिक पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे महिलांनी डोक्यावरून पाण्याचा हंडा आणताना नवीन वर्षाची गावाला ग्रामपंचायतीने भेट दिली असल्याची चर्चा विहिरीपासून ते गावच्या पारापर्यंत व घराघरांत रंगली. गावातील काही नागरिकांनी गावची पाणीपट्टी थकवल्यामुळे नळाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. ज्या नागरिकांनी नियमितपणे गावच्या पाणीपट्ट्या भरल्या आहेत, अशा नागरिकांचा पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे पट्टी भरणाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. गावातील काही धनदांडगे यांनी पिण्याच्या पाण्याचा वापर घराभोवताली बागायत करण्यासाठी करत असल्यामुळे गावचा नळ पाणी पुरवठा सध्या अडचणीचा झालेला आहे. शासनाने गावात पाणीपटटी वसुली करण्यासाठी ग्रामपंचायतीला अनेक अधिकार देण्यात आलेले असताना अशा पध्दतीने पाणी पुरवठा अचानक बंद ठेवून नागरीकांना वेठीस धरले आह. या बाबत ग्रामपंचायत व ग्रामसेवक तसेच पाणी पुरवठा कर्मचारी यांची ही भूमिका नागरीकांना अडचण व अडवणूक निर्माण करणारी आहे. या बाबत गावातील महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायतीने गावात पाणी पटटी वसूल करण्यासाठी काहीही प्रयत्न केले नसल्याचेही बोलले जात आहे.