शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

थर्माेकोलच्या ताट-वाट्यांमुळे धोका

By admin | Updated: April 24, 2017 04:28 IST

कोणताही सामाजिक, कौटुंबिक कार्यक्रम असो, सामूहिक जेवणाच्या पंगतीत विशिष्ट झाडांच्या पानाची पत्रावळी आणि पानाचा

पेठ : कोणताही सामाजिक, कौटुंबिक कार्यक्रम असो, सामूहिक जेवणाच्या पंगतीत विशिष्ट झाडांच्या पानाची पत्रावळी आणि पानाचा द्रोण याला विशेष महत्त्व असायचे. पानाची पत्रावळ ही वरणभात आणि भाजीचा स्वाद द्विगुणीत ठरवीत आले आहेत. म्हणून पंगतीचे जेवण आपसात प्रेम वाढवणारे ठरत आले आहे. परंतु आता ही पंगतीची परंपरा हळूहळू कमी होऊ लागली असून, बुफे पद्धत वाढत चालली आहे. ग्रामीण भागात पंगत आहे परंतु पत्रावळी गायब होताना दिसत आहेत. त्यामुळे पत्रावळीतील भोजनाचा स्वाद आणि द्रोणामध्ये कढी पिण्याचा आनंद पंगतीतून हरवला असल्याचे दिसत आहे.जुन्या पत्रावळींची जागा आता आरोग्याला घातक ठरणाऱ्या प्लॅस्टिक, थर्माेकोलच्या ताट आणि वाट्यांनी घेतली आहे. जेवणासाठी प्लॅस्टिकच्या, थर्मोकोलच्या पत्रावळ्या वापरल्या जातात. जेवून वापरून झालेल्या पत्रावळ्या निष्काळजीपणे इतरत्र टाकल्या जातात. याचा परिणाम पर्यावरणावर होत असून या पत्रावळ्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे काम कार्यमालकांनी करणे गरजेचे आहे.पूर्वीच्या काळी साल वृक्षाच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळी वापरण्याची प्रथा होती. परंतु काळाच्या ओघात आधुनिक पद्धतीच्या प्लॅस्टिकच्या, थर्माेकोलच्या पत्रावळ्या वापरल्या जातात. झाडाच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळ्या बऱ्याच वेळा फाटक्या असतात. सध्या जेवणात निरनिराळे अनेक पदार्थ करण्याचे फॅड वाढले आहे. यामुळे पारंपरिक पत्रावळीत एवढे सगळे पदार्थ बसत नसल्याने प्लॅस्टिकच्या, थर्माेकोलच्या पत्रावळ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. या पत्रावळ्यांची झीज लवकर होत नाही, त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. या पत्रावळ्यांतील राहिलेले अन्न भटकी कुत्री, इतर जनावरे खातात. हे अन्न खाता खाता अन्नाबरोबरच पत्रावळीचा काही भाग त्यांच्या पोटात जाऊन त्यांनाही त्रास होण्याचा संभव लक्षात येत असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून या पत्रावळ्या मातीत गाडून टाकणे, हा उपाय असून यापासून कोणताही धोका नसल्याचे लक्षात येत आहे. (वार्ताहर)