शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

सलग सुट्यांमुळे वाहतूककोंडी

By admin | Updated: May 4, 2015 03:13 IST

पर्यटनाचे मध्यवर्ती केंद्र असलेले लोणावळा शहर सलग सुट्यांमुळे मागील तीन दिवसांपासून पर्यटकांनी गजबजले असून, राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली

लोणावळा : पर्यटनाचे मध्यवर्ती केंद्र असलेले लोणावळा शहर सलग सुट्यांमुळे मागील तीन दिवसांपासून पर्यटकांनी गजबजले असून, राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे़ महाराष्ट्र दिनाच्या सुटीला जोडून शनिवार व रविवार तसेच बुद्धपौर्णिमेची सुटी आल्याने उष्म्याने हैराण झालेल्या पर्यटकांनी थंड हवेचे ठिकाण म्हणून नावलौकिक असलेल्या लोणावळा शहराकडे धाव घेतली आहे़ शुक्रवारी सकाळपासूनच पर्यटकांच्या वाहनांची लोणावळ्याच्या दिशेने संख्या वाढल्याने द्रुतगती महामार्गावरदेखील काही काळ वाहतूककोंडी झाली होती़मागील काही दिवसांपासून वातावरणात उष्णतेचा पारा वाढला आहे़ यामुळे हैराण नागरिक थंड हवेच्या ठिकाणी धाव घेत आहेत. लोणावळ्याच्या हवामानातदेखील या वेळी नागरीकरणामुळे उष्णता वाढली असली, तरी सकाळ व सायंकाळच्या सत्रात या परिसरातील थंड हवा व आल्हाददायीपणा पर्यटकांना आजही भुरळ घालत आहे़ यामुळेच की काय, सलग सुट्यांचा मुहूर्त साधत पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे़ बहुतांश पर्यटक हे स्वत:च्या वाहनांमधून येत असल्याने महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होत आहे़ शहर वाहतूक विभागाचे कर्मचारी व अतिरिक्त कर्मचारी वाहतूक नियोजनासाठी नेमण्यात आले आहे़ मात्र, वाहनांच्या संख्येपुढे रस्तेच अपुरे पडत असल्याने वाहतूककोंडी कमी होत नव्हती़ बहुतांश पर्यटकांचा ओढा हा लायन्स पॉइंट, अ‍ॅम्बी व्हॅली, पवनानगर, वॅक्स म्युझियम या स्थळांकडे सुरू होता़ पर्यटकांच्या संख्येने ही सर्व स्थळे तुडुंब भरली होती़ कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड व राजमाची किल्ला परिसरातदेखील मोठ्या संख्येने पर्यटक गेले होते़ तीन दिवसांच्या कालावधीत चागंला व्यवसाय झाल्याने व्यापारीवर्गात आनंदाचे वातावरण आहे़(वार्ताहर)