शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने मारले, कालव्याने तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 03:20 IST

पुणे जिल्ह्यात इतरत्र पाऊस धो-धो पडत आहे. मात्र, बारामती, इंदापूर तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पाठ फिरविली आहे. त्यामुळे बागायती भागातदेखील अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : पुणे जिल्ह्यात इतरत्र पाऊस धो-धो पडत आहे. मात्र, बारामती, इंदापूर तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पाठ फिरविली आहे. त्यामुळे बागायती भागातदेखील अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. सध्या सुरू असलेल्या नीरा डाव्या कालव्याच्या आवर्तनाने दोन्ही तालुक्यांतील शेतकºयांना तारले आहे.या दोन्ही तालुक्यांतील १५ हजार ५५६ हेक्टर शेतीक्षेत्राला या पाण्याचा फायदा होणार आहे. सध्या हे आवर्तन सुरू आहे.संपूर्ण शेतीक्षेत्राला पाणी मिळण्यासाठी आणखी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. मात्र, नीरा डाव्या कालव्याचे पाणी पोहोचू न शकणाºया भागाचा पाणीप्रश्न अद्याप गंभीरच आहे.बारामती उपविभागाचे उपअभियंता सुभाष अकोसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की नीरा डाव्या कालव्याच्या आवर्तनाची सुरुवात वितरिका क्रमांक ४६ पासून करण्यात आली.सध्या ४६ पासून वितरिका क्रमांक २५ पर्यंत आवर्तन सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. १० आॅगस्टपर्यंत बारामती उपविभागाअंतर्गत येणाºया वितरिकांचे आवर्तन सुरू राहण्याची शक्यता आहे.यामुळे परिसरातील शेतीपिकांना जीवदान मिळणार असून शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. त्यानंतर निमगाव केतकी उपविभागाअंतर्गत येणाºया वितरिकांमधून आवर्तन सोडले जाणार आहे . ६ सप्टेंबरपर्यंत शेतीसिंचनासाठी आवर्तन सुरू राहणार आहे, असे अकोसकर म्हणाले. पणदरे पाटबंधारे उपविभागाअंतर्गत असणाºया वडगाव निंबाळकर, पणदरे, माळेगाव, मळद परिसरात नीरा डाव्या कालव्याअंतर्गत एकूण ५७१८ हेक्टर शेतीक्षेत्र आहे. त्यापैकी १५९७ हेक्टर शेतीला आवर्तन देण्यात आले आहे.८ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण आवर्तन पूर्ण होईल, अशी माहिती पणदरे पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता एस. एस. जगदाळे यांनी दिली.निमगाव केतकी पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता आर. के. घोटुकडे म्हणाले, की निमगाव केतकी उपविभागाअंतर्गत अंथुर्णे क्र. २, निमगाव केतकी १, बावडा शाखेअंतर्गत ५२०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी पाणी अर्ज घेण्याचे काम सुरू आहे.वितरिका क्रमांक ४९ ते ५९ चे आवर्तन १० आॅगस्टनंतर सुरू होणार आहे. सुरुवातीला शेती आवर्तन पूर्ण झाल्यानंतर शेटफळ हवेली तलावात पाणी सोडण्यात येणार आहे.या तलावात सोडण्यात येणाºया पाण्याबाबत धरणक्षेत्रात पडणाºया पावसावर अवलंबून आहे, असे घोटुकडे म्हणाले.दीड महिन्यापासून पावसाची दडीजून महिन्याच्या सुरुवातीला पावसाची सुरुवात चांगली झाली. मात्र, त्यानंतर जवळपास दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. मात्र, वीर, भाटघर धरणक्षेत्रावर दमदार पाऊस सुरू आहे. पाणीसाठ्यामुळे बारामती, इंदापूर तालुक्यात शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले. पावसाअभावी अडचणीतील शेतीला या आवर्तनाने तारले आहे. बारामती पाटबंधारे उपविभागाअंतर्गत बारामती, सणसर (ता. इंदापूर), अंथुर्णे क्र. १ तीन कार्यालये येतात. या तिन्ही शाखा कार्यालयांतर्गत ४६४८ हेक्टर शेतीक्षेत्राला पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या हे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.