शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
4
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
5
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
6
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
7
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
8
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
9
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
10
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
11
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
12
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
14
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
15
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
16
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
17
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
18
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
19
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
20
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला

पावसामुळे पालेभाज्या तेजीत

By admin | Updated: October 5, 2015 01:53 IST

जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने पालेभाज्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी बाजारात होणारी आवक घटल्याने भाववाढ झाली आहे.

पुणे : जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने पालेभाज्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी बाजारात होणारी आवक घटल्याने भाववाढ झाली आहे. नवीन कांद्याची आवक वाढू लागल्याने कांद्याच्या भावात घट होऊ लागली आहे. तसेच पितृपंधरवड्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या भाज्या तेजीत आहेत. गुलटेकडी येथील मार्केट यार्डमध्ये रविवारी १८० ते १९० ट्रक शेतमालाची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक काही प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्याच्या बहुतेक भागांत तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. परिणामी पालेभाज्यांची आवक कमी होत असून, बाजारात आलेला मालही काही प्रमाणात खराब आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या भाज्यांना अधिक मागणी आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीचे भाव स्थिर असले तरी तेजीत आहेत. कोथिंबिरीची आवक सुमारे १ लाख जुडी एवढी झाली. मेथीच्या भावात मात्र वाढ झाली आहे. रविवारी मेथीची केवळ ३५ हजार जुडी आवक झाली. पालकचे भावही आवक कमी झाल्याने वाढले आहेत. इतर भाज्यांचे भाव काही स्थिर पण तेजीत राहिले. फळभाज्यांमध्ये कांद्याचे भाव उतरू लागले आहे. बाजारात नवीन कांद्याची आवक वाढू लागल्याने भाववाढ थांबली आहे. रविवारी बाजारात नवीन कांद्याची ५० ट्रक, जुन्या कांद्याची १० ट्रक आणि इजिप्त कांद्याची केवळ २ ट्रक आवक झाली. पितृपंधरवड्यामुळे भेंडी, गवार, चवळी, काकडी, कारली, तांबडा भोपळा या भाज्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे भाव तेजीत आहेत. वांगी, पावटा, घेवडा, घोसावळे या भाज्यांचे भावही वाढले आहेत. बाजारात रविवारी परराज्यातून कर्नाटक येथून ४ ते ५ ट्रक कोबी, कर्नाटक व मध्य प्रदेशातून १५ ते १६ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथून ५ ते ६ टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून २ टेम्पो भुईमूग शेंग, आग्रा व इंदौर येथून ४० ते ४५ ट्रक बटाटा व मध्य प्रदेशातून सुमारे ३ हजार गोणी लसणाची आवक झाली. स्थानिक भागातून बाजारात सुमारे ५५० गोणी सातारी आले, ५.५ ते ६ हजार पेटी टोमॅटो, १८ ते २० टेम्पो फ्लॉवर, १४ ते १५ टेम्पो कोबी, १० ते १२ टेम्पो ढोबळी मिरची, ८ ते १० टेम्पो गाजर, २०० ते २५० गोणी भुईमूग शेंग, ४० ते ५० गोणी मटार, १४ ते १५ टेम्पो तांबडा भोपळा आणि सुमारे ८ हजार गोणी बटाट्याची आवक झाली. नवरात्रोत्सवासाठी बाजारात रताळ्याची आवक सुरू झाली आहे. कराड येथून २ ट्रक आवक झाली.