शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

‘सिग्नल तोडण्या’च्या अतिघाईमुळे जीव टांगणीला

By admin | Updated: March 20, 2017 04:46 IST

चौकात पोलीस असेल तरच सिग्नलची शिस्त पाळायची, नसेल तर काही क्षण थांबून सुसाट वाहने दामटायची, अशा अतिघाईत

पुणे : चौकात पोलीस असेल तरच सिग्नलची शिस्त पाळायची, नसेल तर काही क्षण थांबून सुसाट वाहने दामटायची, अशा अतिघाईत असलेल्या वाहनचालकांच्या घातक सवयीमुळे पादचारी आणि अन्य दिशेने येणाऱ्या वाहनचालकांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. शहरातील बहुसंख्य चौकांमध्ये ही स्थिती असून सिग्नल ’तोडण्याच्या’ सवयीची लागण काही जणांना होत असली, तरी अनेक जण हिरवा दिवा लागेपर्यंत संयम पाळत असल्याचे संमिश्र चित्रही असल्याने जिवाच्या धोक्याची जाणीव बहुसंख्यांना होऊ लागली आहे. ४पुण्यात स्वयंचलित सिग्नलची सुविधा निर्माण होऊन अनेक वर्षे उलटली. स्वयंचलित सिग्नलची सुविधा होण्यापूर्वी चौकात थांबलेले वाहतूक पोलीस नियमन करत असत. त्या वेळी वाहनांची संख्या कमी असल्याने आणि पोलिसांचा धाक असल्याने पोलिसाच्या आदेशाकडे सहसा दुर्लक्ष केले जात नसे. वाढती वाहनसंख्या आणि कमी मनुष्यबळाच्या पार्श्वभूमीवर सिग्नलची सुविधा निर्माण केली गेली. लाल दिवा लागलेला असल्यास वाहन थांबवून पादचाऱ्यांना, पलीकडून जाणाऱ्या वाहनांना जाऊ देण्याची खूण सर्व दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकीस्वारांना ओळखीची झाली आहे. मात्र, अतिघाईत असलेले वाहनचालक ’सिग्नल तोडून’ सुसाट वेगाने पसार होत असल्याने रस्ता ओलांडणारे पादचारी, अन्य वाहने यांची त्रेधा उडून अपघात होत असल्याचे चित्र आहे.सकाळी साडेनऊ ते दुपारी १ तसेच सायंकाळी ५ ते रात्री९ गजबजलेल्या, मोठ्या चौकांमध्ये पोलीस नसले तरी वेगाने जाणाऱ्या प्रचंड वाहनसंख्येमुळे सिग्नल तोडण्याची हिंमत सहसा केली जात नाही. डेक्कन जिमखान्यावरील खंडुजीबाबा चौक, अलका चित्रपटगृहाजवळील टिळक चौक, स्वारगेटजवळील जेधे चौक, वेधशाळेजवळील खुडे चौक, संचेती रुग्णालयाजवळील चौक, झाशीची राणी पुतळ्याजवळील चौक, स. प. महाविद्यालयाजवळील चौक, गाडीतळाजवळील चौक, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील चौक, दांडेकर पुलाजवळील तसेच सेनादत्त पोलीस चौकीजवळील चौक, दशभुजा गणपती व नळस्टॉपजवळील चौक, कर्वे पुतळ्याजवळील चौक, अप्पा बळवंत चौक, शनिपाराजवळील चौक अशा सतत गजबजलेल्या चौकांमध्ये सिग्नलची शिस्त सहसा पाळली जाते. तुलनेने कमी वर्दळ असलेल्या चौकांमध्ये, अरुंद रस्त्यावरील तसेच अवजड वाहतूक फारशी नसलेल्या ठिकाणी सिग्नल तोडण्याची घाई वेगवान वाहने असलेले युवक प्रामुख्याने करतात. काही चौकांमध्ये तरुणांच्या बरोबरीने महिला, ज्येष्ठ, रिक्षाचालक, बसचालक, दुचाकीस्वार अशा सर्व वाहनचालकांना विशिष्ट चौकांमध्ये सिग्नल तोडण्याची सवय झालेली आहे. सिंहगड रस्त्यावरील माणिकबागेजवळील चौक, यशवंतराव चव्हाण पूल ते कर्वे रस्त्यावरील गरवारे शाळा, राजाराम पुलाजवळील चौक अशी काही बेशिस्त वाहनचालकांची नेहमीची ठिकाणे आहेत. पोलिसांनी महिनोन्महिने कारवाई केल्यानंतर स्थानिक वाहनचालक पोलिसांचा अभाव असतानाही सिग्नल पाळताना दिसतात. काही ठिकाणी सरळ रस्ता आणि डावीकडे जाणारा फाटा असेल तर डावीकडे जाण्यासाठी हिरवा सिग्नल नसतानाही घुसखोर व अतिघाईतील वाहनचालक वाहने दामटतात. त्यामुळे फाट्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांची स्वत:चा बचाव करत वाहने चालविण्याची कसरत होते.