पिंपरी : नवरात्रौत्सव गुरुवारपासून सुरू होत असताना बाजारपेठा विविध फुलांनी बहरल्या आहेत. पितृपंधरवड्यात उतरलेला बाजाराचा दर नवरात्रौत्सवाच्या चाहुलीने पुन्हा तेजीत आला आहे.नवरात्रौत्सवात ताज्या फुलांना अतिशय मागणी असते. फुलांचे दर ५० टक्क्यांनी वाढले आहेत.दर : कलकत्ता गोंडा : ४० ते ५० रु. किलो, साधा गोंडा २० ते ३० रु. किलो, गुलछडी २०० रु. किलो, राजा शेवंती १८० ते २०० रु. किलो, बिजली १०० रु. किलो, अॅस्टर १२० ते १०० रु. किलो, काकरी ६० ते ७० रु. किलो, गुलाब ३० ते ४० रु. किलो, गजरे (काकडा बंडल) २५० ते ३०० रु. किलो. फुलांचे दर वाढ असताना फुलांच्या हारांचे दरही तेवढेच वधारले आहेत. दर (कंसात पूर्वीचे दर) : तोकडा हार ३० रु. (१५ रु.), गुलाब (रिमझिम हार) ३०० रु. (२०० ते १५०), पूर्ण गुलाब मोठा हार ४०० रु. (२५० रु.) (प्रतिनिधी)
नवरात्रीमुळे फुलांच्या दरात दीडपट वाढ
By admin | Updated: September 25, 2014 06:22 IST