शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वनपरिक्षेत्र कार्यालय हलविल्याने नारायणगावात संताप

By admin | Updated: November 17, 2016 02:40 IST

वनपरिक्षेत्र पुनर्रचनेत नारायणगाव येथील वनपरिक्षेत्र कार्यालय मंचर येथे हलविण्यात आल्याने जुन्नर तालुक्यात संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.

नारायणगाव : वनपरिक्षेत्र पुनर्रचनेत नारायणगाव येथील वनपरिक्षेत्र कार्यालय मंचर येथे हलविण्यात आल्याने जुन्नर तालुक्यात संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. नारायणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत बिबट्यांचा सर्वांत जास्त वावर असताना हे कार्यालय का हलविण्यात आले? असा सवाल केला जात आहे. विशेष म्हणजे जुन्नर बिबट्या प्रवण क्षेत्र असून, आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू, तर १६ जण जखमी झाले आहेत. येथेच आवश्यकता असताना कार्यालय हलविण्याचा हा घाट का? असा सवाल केला जात आहे. १ नोव्हेंबर २0१६ पासून नारायणगावचे कार्यालय बंद करून ते मंचर येथे हलविण्यात आले़ पिंपळगाव जोगा धरण झाल्यानंतर सन २00१ मध्ये जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा प्रश्न सुरू झाला़ तालुक्यात सर्वांत जास्त बिबट्यांचा गंभीर प्रश्न नारायणगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गतच सुरू आहे. खेड, घोडेगाव, जुन्नर, नारायणगाव, ओतूर वनपरिक्षेत्रात आतापर्यंत २७ जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून, त्यातील १३ जण हे नारायणगाव वनपरिक्षेत्रातील आहेत. ५३८ जनावरे मृत्युमुखी पडलेले आहेत़ वनविभागाने नारायणगाव कार्यालयांतर्गत होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यासाठी विशेष पथक तयार करून खास बाब म्हणून मोबाईल व्हॅन दिली आहे, असे असताना नारायणगाव वनपरिक्षेत्र कार्यालय बंद करण्याचा निर्णय कसा घेतला गेला? याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये सभ्रमावस्था आहे. नारायणगाव वनपरिक्षेत्र कार्यालय १९६४ रोजी सुरू झाले. जुन्नर वनविभागाअंतर्गत जुन्नर, नारायणगाव, ओतूर अशी तीन वनपरिक्षेत्र कार्यालये आहेत़ त्यापैकी नारायणगाव कार्यालय बंद करण्यात आले़ दोन्ही तालुक्यांतील क्षेत्र आणि गावांचा विचार करता नारायणगाव कार्यालय हे जुन्नर तालुक्यातच राहणे आवश्यक आहे. जुन्नर तालुक्यात सर्वाधिक बिबट्यांचा उपद्रव सुरू आहे़ १00 हून अधिक बिबटे पकडण्यात आले असून, माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात एकूण ३१ बिबटे आहेत़ तर वनविभागाच्या सर्वेनुसार जुन्नर तालुक्यात ७0 हून अधिक बिबटे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ बिबट्यांबाबत हा संवेदनशील तालुका असताना महत्त्वाचे कार्यालय बंद करून हलविण्याचा निर्णय घेतला जात आहे़. कार्यालय पूर्ववत करा४सर्वांत जास्त बिबटे नारायणगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गतच आहेत़ हे कार्यालय बंद केल्याने नारायणगाव वनविभागाअंतर्गत असलेले नारायणगाव, शिरोली, सावरगाव आदी परिसर जुन्नर वनविभागाला जोडण्यात आला आहे़ तर खोडद, बेल्हा परिसर ओतूर वनविभाग कार्यालयाला जोडण्यात आला आहे़ नारायणगाव वनपरिक्षेत्रात झालेल्या आत्तापर्यंतच्या घटना लक्षात घेऊन नारायणगाव येथील वनकार्यालय पूर्ववत सुरू करण्यात यावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे़ (प्रतिनिधी)