शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

संवाद हरवल्याने जुळेनात सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:14 IST

विवाहानंतर नवीन आयुष्याची सुरुवात करताना, एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे ठरते.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : विवाहानंतर नवीन आयुष्याची सुरुवात करताना, एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे ठरते. परंतु, कुटुंबातील, नात्यातील सुसंवाद हरपला आहे. एकमेकांना समजून घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. विश्वास आणि सामंजस्याची भावना त्यांच्यात रुजत नाही. नात्यातील अन्य व्यक्तींचा वाढता हस्तक्षेप, नवदाम्पत्यांमध्ये दुरावा निर्माण करण्यास कारणीभूत ठरू लागला आहे. अशा विविध कारणांमुळे उच्च शिक्षित, तसेच नवविवाहितांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला असल्याचा निष्कर्ष निघत असल्याचे मत समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. गेल्या सहा महिन्यांत घडलेल्या घटनांमध्ये नवविवाहित महिलांंच्या आत्महत्येच्या घटनांचा समावेश आहे. त्यातही उच्चशिक्षित महिला आणि नवविवाहित दाम्पत्य असल्याने चिंता व्यक्त होत आहे.हुंडा ही अनिष्ठ प्रथा नष्ट होण्यासाठी कायदा अंमलात आला. परंतु खोलवर रुजलेली प्रथा आजही समाजात आहेच. आयटीत काम करणाºया अभियंत्यांना गलेलठ्ठ पगार, घरची आर्थिक सुबत्ता असताना, पत्नीच्या वडिलांनी हुंडा स्वरूपात काही तरी द्यावे. ही अपेक्षा त्या खोट्या प्रतिष्ठेपायी व्यक्त होत असते. हुंडा घेणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले गेल्याने सुश्क्षिित तरुणांकडून नवविवाहितांचा हुंड्यासाठी छळ होत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. - अ‍ॅड़ मनीषा महाजनमाहेरहून पैसे आणावेत, अशी मागणी करून छळ केल्यामुळे पुनावळे येथे माधुरी किरण फडतरे हिने आत्महत्या केली. किरण फडतरे आणि माधुरी यांचा विवाह २०१४ मध्ये झाला. विवाहानंतर किरण याने माधुरीकडे माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला होता. छळाला कंटाळून माधुरीने २४ फेब्रुवारी २०१७ ला आत्महत्या केली़आयटी अभियंते यांना गलेलठ्ठ पगार असतो, तरीही पत्नीने माहेरहून पैसे आणावेत अशी अपेक्षा का बाळगली जाते? असा प्रश्न अशा घटना घडू लागल्याने उपस्थित होऊ लागला आहे.उच्चशिक्षित नवदाम्पत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार चिखली, मोरेवस्ती भागात उघडकीस आला. अनिकेत विलास ढमाले (वय २५), अश्विनी अनिकेत ढमाले (वय २२) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.>हुंड्याची प्रथा अजूनही रूजलेलीमाहेरहून पैसे आणावेत, यासाठी वारंवार तगादा लावला. तसेच पती व सासरच्या मंडळींनी शारीरिक, मानसिक छळ केला. त्यामुळे प्रियंका इतेश शेंडगे या विवाहितेने साडीच्या साह्याने घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खडकी येथे घडली. २० डिसेंबर २०१५ ला तिचे इतेशबरोबर लग्न झाले होते. अवघ्या दोन वर्षांत तिने स्वत:ला संपविले.महिन्यापूर्वीच झाला होता विवाहनवविवाहितेने तिसºया मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना पिंपरीतील भीमनगर येथे घडली. पुष्पा हर्षद लोखंडे (वय २८) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. नवविवाहितेने आत्महत्या केली. महिन्यापूर्वीच तिचा विवाह झाला होता.