शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या इथेनॉलमुळे पेट्रोल दरवाढीत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:01 IST

मागणीच्या ३५ टक्केच पुरवठा : समन्वयाअभावी बारगळले धोरण

पुणे : पेट्रोल-डिझेलच्या भावात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. या इंधनाला इथेनॉलचा आधार मिळाल्यास दरात देखील २० टक्के घसरण होऊ शकेल, असा अंदाज साखर क्षेत्रातून व्यक्त होत आहे. मात्र, सरकार, आॅईल कंपन्या आणि इथेनॉल उत्पादकांतील समन्वयाअभावी गेल्या सात वर्षांत मागणीच्या ३६ टक्के देखील पुरवठा झाला नसल्याचे चित्र आहे.देशात दरवर्षी आॅईल कंपन्यांकडून गाळप हंगाम सुरु झाल्यानंतर मागणीचा कोटा जाहीर केला जातो. कारखान्यांनी भरलेला कोटा आणि प्रत्यक्ष पुरवठा अशा विविध टप्प्यांवर इथेनॉलचा पुरवठा कमी होत असल्याचे वास्तव सात वर्षांच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. देशातील एकूण ऊस गाळपापैकी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात ७० टक्के गाळप होतो. याच राज्यातून अत्यल्प पुरवठा होत असल्याने इथेनॉल पुरवठ्याची गंभीरता अधोरेखीत होते.देशात २०१७-१८ या हंगामात ३१३ कोटी ५७ लाख ७४ हजार लिटरची मागणी आॅईल कंपन्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतर १२६ उत्पादकांना १३८ कोटी १२ लाख ९ हजार लिटरचा कोटा मंजूर केला गेला. हा कोटा मागणीच्या तुलनेत १७५ कोटी ७५ लाख ६५ हजार लिटरने कमी आहे. चालू हंगामासाठी महाराष्ट्राला ४३ कोटी ५९ लाख लिटरचा कोटा मंजूर करण्यात आला आहे. मागणीच्या केवळ ३० टक्केच उचल झाली आहे. पुढील सहा महिन्यांत ७० टक्के उचल करण्याचे आव्हान आॅईल कंपन्यांसमोर आहे.इथेनॉल मिश्रणाचे १० टक्क्यांचे धोरण कागदावरकेंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिश्रणाचे धोरण ठेवले आहे. मात्र, अजूनही ५ टक्के देखील इथेनॉल मिश्रण आपण करु शकत नसल्याचे महाराष्ट्र राज्य साखर कारखाना महासंघातील अधिकाºयांनी सांगितले.जगभरात मका आणि उसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती होते. भारतात मळीपासून इथेनॉलची निर्मिती केली जाते. पूर्वी इथेनॉलवर असलेला साडेबारा टक्के अबकारी कर माफ करण्यात आला होता. आता वस्तू आणि सेवा करात तो १८ टक्के करण्यात आला आहे. इथेनॉलची किंमतही ४८ वरुन ४०.८५ रुपये केली आहे. इथेनॉलला प्रोत्साहन दिल्यास इंधनाच्या किंमतीत २० टक्के घट होईल.-प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ.केंद्र सरकारने इथेनॉलचे दीर्घकालीन धोरण ठरविले पाहिजे. इथेनॉलला हमीभाव दिल्यास त्यासाठी साखर कारखाने गुंतवणूक करतील.- दिलीप वळसे-पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ.

टॅग्स :Petrolपेट्रोल