शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालयांची शुल्क भरण्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:15 IST

राज्यातील काही विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तातडीने संपूर्ण शुल्क दोन दिवसांत भरा; अन्यथा प्रवेश रद्द करू,

पुणे : राज्यातील काही विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तातडीने संपूर्ण शुल्क दोन दिवसांत भरा; अन्यथा प्रवेश रद्द करू, अशी सक्ती केल्याने अनेक विद्यार्थी व पालक अडचणीत आले होते. यापार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांना अशी सक्ती करता येणार नसल्याचे आदेश काढण्यात येतील, असे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले आहे.मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत त्यांचे प्रवेश शुल्क शासनाकडून महाविद्यालयांना दिले जाते. तरीही विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे. इस्लामपूरच्या प्रकाश वैद्यकीय महाविद्यालयाने एका अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याकडून प्रवेश शुल्कापोटी १० लाख रुपयांचा डीडी मागितला गेला व तो न देऊ शकलेल्या विद्यार्थ्याचा प्रवेश नाकारण्यात आला. या पार्श्वभूमीवर आरक्षण हक्क संरक्षण समिती व दलित आदिवासी अधिकार आंदोलनाच्या शिष्टमंडळाने गिरीश महाजन व समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन त्यांच्या निर्दशनास ही बाब आणून दिली. याबाबत तातडीने कार्यवाही करून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत व त्यांची अडवणूक करणाºया महाविद्यालयांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, प्रियदर्शी तेलंग, विद्यार्थी बिपीन शेलार व पालक सीमा शेलार, अविनाश खाडे, डॉ. संजय दाभाडे, मुक्ती साधना, प्रतिमा पडघम आदी उपस्थित होते.मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क भरण्याची जबाबदारी शासनाची असून महाविद्यालयांना शुल्काची रक्कम शासनाकडून मिळेलच अशा आशयाचा शासन निर्णय पुन्हा नव्याने काढू, असे समाजकल्याण आयुक्तांनी स्पष्टकेले आहे. कोणत्याहीविद्यार्थ्याच्या प्रवेशास अडथळा येणार नाही, अशी उपाय योजना केल्या जातील, असेही त्यांनी या वेळीस्पष्ट केले.