शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

स्तूत दोष असल्याची भीती दाखवून ३५ तोळे सोने पळविले

By admin | Updated: February 1, 2017 00:13 IST

वास्तूदोष असल्यामुळे घरात समस्या असल्याची भिती दाखवून एका भोंदूबाबाने एका विधवेकडील ३५ तोळे दागिने घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.1 -  वास्तूदोष असल्यामुळे घरात समस्या असल्याची भिती दाखवून एका भोंदूबाबाने एका विधवेकडील ३५ तोळे दागिने घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी वानवडी पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली आहे.
हितेंद्र सतीश इंगळे (वय ३२, रा. संजीवनी सोसायटी, सहकारनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. या महिलेचा सोपानबाग येथे बंगला आहे. महिलेच्या पतीचे २०१३ मध्ये ह्रदयविकाराने निधन झाले. त्यानंतर सासूचे निधन झाले. त्यामुळे महिला एकटीच दु:खात होती. महिलेला एका मैत्रिणीने एका पंडिताची माहिती दिली. तो घरातील दोष दूर करून देईल, असे सांगितले. महिलेने त्या भोंदूबाबाशी संपर्क केला तेव्हा त्याने मदत करण्याचे आश्वासन दिले.
भोंदूबाबा महिलेच्या घरी आला. त्याने तुमच्या वास्तुमध्ये दोष आहे. वास्तूदोष काढण्यासाठी पूजा करावी लागेल असे सांगून पुजेसाठी ११ हजार रुपये घेतले. त्यानंतर तुमच्या सासू, पतीच्या वस्तू व दागिने आहेत. त्यामुळे तुमचे व मुलांचे बरेवाईट होईल, अशी भीती दाखविली.  या वस्तू शुद्ध करुन घ्याव्या लागतील, असे सांगितले. महिलेने सोने लॉकरमध्ये असल्याचे सांगितले. लॉकरमधील सोने न पाहता एका पेटीत घालून आण आणि तो कोणालाही सांगू नको, असे सांगितले. पण, महिलेने ते सोने पाहिले. त्यामुळे या सोन्याचा आता काहीच उपयोग नाही. हे सोने नदीत फेकून द्यावे लागेल म्हणत ३५ तोळे सोने घेऊन गेला. पण, त्याचा संपर्क होत नसल्यामुळे महिला घरात रडत बसली होती. त्या महिलेस काही जणांनी पोलिसांना संपर्क करण्यास सांगितला. या महिलेने वानवडी पोलिसांकडे जाऊन वरिष्ठ निरीक्षक सचिन सावंत यांच्याकडे तक्रार केली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागूल यांच्या टीमने घरी जाऊन इंगळेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून महिलेचे ३५ तोळे सोने पोलिसांनी जप्त केले आहे.