शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलामुळे ३० ते ४० टक्केच कांदा लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळेगाव ढमढेरे : यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे व हवामानातील मोठ्या बदलामुळे बहुतांश शेतकरी वर्गाचे कांदा पीक वाया ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तळेगाव ढमढेरे : यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे व हवामानातील मोठ्या बदलामुळे बहुतांश शेतकरी वर्गाचे कांदा पीक वाया गेल्याने दर वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या हंगामात साधारण तीस ते चाळीस टक्केच कांदा लागवडी झाल्याने शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. यावर्षी कांद्याला बाजारभाव समाधानकारक असला तरी शेतकऱ्यांच्या हाती मालच नसल्याने शिरूर तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

दरवर्षी बळीराजा ऑगस्ट, सप्टेंबरदरम्यान कांदा रोपे तयार करण्याची प्रक्रिया करीत असतो. ही रोपे तयार झाल्यानंतर साधारण दीड ते दोन महिन्यांत म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर दरम्यान शेतकरी वर्ग कांद्याच्या रोपांची लावणी (लागवड) करतात. या वर्षीच्या कांदा रोप प्रक्रियेच्या दरम्यान निसर्ग कोपल्याने पावसाच्या अतिवृष्टीमुळे व हवामानातील मोठ्या बदलाने अक्षरशः अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कांद्याची रोपे वाहून गेली. तर काही शेतकऱ्यांची रोपे अनेक दिवस पाणी साठून राहिल्याने जाग्यावरच सडून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. दर वर्षीच्या तुलनेत शिरूर तालुक्‍यात या वर्षी कांद्याचे पीक साधारण तीस ते चाळीस टक्केच दिसून येत आहे. सध्या अनेक व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतावर येऊन कांदा साधारण ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करीत आहेत. शेतकरी वर्गास कांद्याला बाजार भाव समाधानकारक मिळत असला तरी शेतकऱ्यांच्या शेतात माल नसल्याने शेतकरी वर्ग मात्र हतबल झाल्याने आर्थिक विळख्यात सापडला आहे. विशेषता बहुतांश शेतकऱ्यांचे कांदा पिकांवर आर्थिक नियोजन ठरलेले असते. यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे वर्षाचे आर्थिक नियोजन कोलमडल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

चौकट:

या वर्षीच्या हंगामात ऑगस्टच्या दरम्यान दहा हजार रुपये पायलीप्रमाणे दोन पायल्यांचे कांदा बियाणे वीस हजार रुपये किमतीला खरेदी करून रोप प्रक्रियेसाठी शेतात लावले. परंतु तयार झालेली रोपे पावसाच्या अतिवृष्टीमुळे अक्षरश: वाहून गेली तर काही रोपे जाग्यावरच सडली गेली. तरीदेखील खचून न जाता शेवटच्या टप्प्यात अर्धा एकर पुन्हा कांदा रोपांची लागवड केली. परंतु त्यातीलही निम्मा कांदा सडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.

-आबू भोसले (प्रगतशील शेतकरी, दरेकरवाडी)

फोटो ओळ: विठ्ठलवाडी येथे कांदा खरेदी करताना व्यापारी.