शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

लग्न-सोहळे रद्द झाल्याने ग्रामीण भागातील कापड व रेडिमेड कपडे व्यावसायिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:08 IST

बेरोजगारीमुळे अनेकांनी मिळेल त्या बँकेचे कर्ज घेऊन व्यवसायात करिअर करण्याच्या उद्देशाने कापड, रेडिमेड दुकाने थाटली आहेत. मात्र, अनेक तरुणांनी ...

बेरोजगारीमुळे अनेकांनी मिळेल त्या बँकेचे कर्ज घेऊन व्यवसायात करिअर करण्याच्या उद्देशाने कापड, रेडिमेड दुकाने थाटली आहेत. मात्र,

अनेक तरुणांनी नोकरी मिळविण्यासाठी खेटे मारून पदरी निराशा पडल्यानंतर निरनिराळ्या व्यवसायाला जवळ केले आहे. काही तरुणांनी कापड व रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय निवडला आहे.

मुख्य बाजारपेठेत दुकान घेण्यासाठी त्यांना पाच ते दहा

लाखांपर्यंतची जागा, मिळेल त्या बँकेचे कर्ज, भाड्याने घेतले तर दहा ते वीस हजारपर्यंत भाडे, फर्निचर, नोकर आदींची मोट बांधताना लाखोंचा खर्च आला आहे. या व्यवसायाचे सर्वांत मोठे सिझन म्हणजे लग्नसराई. या सिझनमध्ये उभारी देऊन जाते.

परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन्ही लग्नसराईचा सिझन लॉकडाऊन असल्याने मोकळा गेल्याने कापड व्यावसायिक हतबल झाले आहेत.

दुकानाला कुलूप

ऐन लग्नसराईत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्याने व्यवसायाला गती येण्याआधीच दुकानाला लॉक लागले. परिणामी, नफा कमवून आर्थिक गाडी रुळावर आणणे सोडा; हजारो रुपयांचे दुकान भाडे, लाईटबिल व लाखो रुपयांच्या कर्जाचे व्याज या व्यावसायिकांवर बसले आहे.

पुणे शहरातील सर्व व्यवसाय सुरू, ग्रामीणमधील बंद

प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या

उपाययोजनांमुळे कोरोनाचा फैलाव कमी झाला आहे. दरम्यान, पुणे शहरात सर्व दुकाने उघडल्याने नागरिकांना

सुविधा उपलब्ध झालेली आहे. पण ग्रामीण भागात अजूनही व्यवसायांना परवानगी नसल्याने नियम घालून परवानगी देण्यात यावी, अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे आहे.

लाखोंची गुंतवणूक करून कापड विक्रीचे दालन सुरू केले.परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षांपासून व्यवसायात काहीच उत्पन्न नसून दालनाचे भाडे व लाईट बिल खिशातूनच भरावे लागत आहे.जिल्हा प्रशासनाने पूर्व हवेलीतील लोणी काळभोर,कदमवाकवस्ती अशा मोठ्या गावातील व्यावसायिकांना नियमावली देऊन व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी.

करण गायकवाड(व्यावसायिक)