शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मोटारीने पेट घेतल्याने महिलेचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 01:16 IST

चालत्या मोटारीने अचानक पेट घेतल्याने संगीता मनीष हिवाळे (वय ४४) या महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी हिंजवडी परिसरात मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाकड जकात नाक्याजवळ मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली.

हिंजवडी : चालत्या मोटारीने अचानक पेट घेतल्याने संगीता मनीष हिवाळे (वय ४४) या महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी हिंजवडी परिसरात मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाकड जकात नाक्याजवळ मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. मोटारीतील तिघांना सुखरूप बाहेर पडण्यात यश आले. ते किरकोळ जखमी झाले आहेत.हिंजवडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगीता यांना रात्री रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. त्यांना जॉन डॅनियल बोर्डे हे मोटारीत घेऊन रुग्णालयाकडे निघाले. मोटारीत संगीता यांच्यासह सायमन मनीष हिवाळे (वय १५), तसेच माया डॅनियल बोर्डे (वय ६५), जॉन डॅनियल बोर्डे (वय ४०) हे तिघेही होते. वाकड जकात नाक्याजवळ गेले असता, मोटारीच्या मागील बाजूने अचानक धूर येत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी मोटार सर्व्हिस रस्त्याला नेली. परंतु मोटारीने अधिक पेट घेतला होता. पेटत्या मोटारीतून तिघे जण बाहेर पडले. त्यांना किरकोळ जखम झाली.प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्याने संगीता यांना तातडीने बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे मोटारीतच त्यांचा आगीत होरपळून मृत्यूझाला. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.