शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

दिवेघाटात १६ ठिकाणी धोकादायक दरडी

By admin | Updated: June 10, 2017 01:50 IST

संत ज्ञानेश्वरमहाराज यांची पालखी २० जून रोजी सासवड मुक्कामी येत आहे. त्यानंतर या पालखीचा पुरंदर तालुक्यातील प्रवास नीरा शहरापर्यंत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगराडे : संत ज्ञानेश्वरमहाराज यांची पालखी २० जून रोजी सासवड मुक्कामी येत आहे. त्यानंतर या पालखीचा पुरंदर तालुक्यातील प्रवास नीरा शहरापर्यंत आहे. या काळात पालखीसोबत लाखो वारकरी पायी प्रवास करीत असतात. त्यांना प्रवासात रस्त्यावर कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी सर्वांनी घ्यावयाची आहे. दिवे घाटात १६ ठिकाणी दरडी कोसळल्याची माहिती मला मिळाली. पाहणीत दरडी ढासळल्याची गंभीरता लक्षात आली. दिवेघाटात दरडीबरोबर घाटातील बाजूची गटारे अनेक ठिकाणी बंद आहेत. राडारोडा रस्त्यावर येऊन अपघाताची शक्यता आहे. दिवेघाटातील दरडी तातडीने दूर करण्यासाठी व इतर दुरुस्तीसंदर्भात आपण जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. झेडेंवाडी येथील दिवेघाटात दरडी कोसळल्या असून त्या तातडीने काढाव्यात, यासाठी जेजुरी येथील बैठक आटोपून सुप्रिया सुळे यांनी स्वत: दिवेघाटातील दरडींची पाहणी केली. या वेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण, नीरा मार्केट कमिटीचे उपसभापती ईश्वर बागमार, पुणे जिल्हा राष्ट्रवादी पुस्तक सेलचे कार्याध्यक्ष प्रा. जितेंद्र देवकर, दिवे गावचे उपसरपंच अमित झेंडे, प्रवीण शिंदे, शाम टिळेकर उपस्थित होते.