शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
4
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
5
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
6
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
7
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
9
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
10
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
11
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
12
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
13
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
14
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
15
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
16
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
17
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
18
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
19
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
20
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख

By admin | Updated: March 27, 2017 01:57 IST

वसंताच्या आगमनाबरोबर निसर्गात पशुपक्षांच्या आगमनालाही उधाण आले आहे. पुणे जिल्ह्यातील वेगवेगळे तलाव, धरणे, नद्यांमध्ये

नीलेश काण्णव / भीमाशंकरवसंताच्या आगमनाबरोबर निसर्गात पशुपक्षांच्या आगमनालाही उधाण आले आहे. पुणे जिल्ह्यातील वेगवेगळे तलाव, धरणे, नद्यांमध्ये विणीच्या हंगामासाठी परदेशी पाहुणे आले आहे. त्यांनी घरटी थाटून त्यात अंडी घालण्यास सुरुवात केली आहे. परंतु, उन्हाळ्याची वाढती तीव्रता व कमी होत चाललेले पाणी. यामुळे या परदेशी पाहुण्यांनाही त्याच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. डिसेंबर ते एप्रिल या विणीच्या हंगामात पुणे जिल्ह्यात उजनीचा विस्तीर्ण जलाशय, पिंपळगाव जोगे धरण, भादलवाडीचा ब्रिटिशकालीन तलाव, घोड, भीमा नद्यांपासून भोसरी-निगडी पुण्यासारख्या शहरांमध्ये असलेल्या छोट्या-मोठ्या तलावांमध्येही हे परेदशी पाहुणे पाहावयास मिळतात. यामध्ये राखी बगळे, हळदी कुंकू, चित्रबलक, थापट्या, उघड्या चोचीचा करकोचा, शराटी, नदीसुरय, करोता, पाणकोंबड्या,फ्लेमिंगो, ग्रे-हेरॉन, स्पून बील, स्पॉट बील, ब्लॅक हेडेड, ब्राह्मणी डक अशा विविध प्रकारच्या पक्षांचे आगमन झाले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी पक्षी येऊ लागतात व डिसेंबरमध्ये त्यांची संख्या वाढते. जानेवारीमध्ये विणीच्या हंगामासाठी येणारे पक्षी मोठ्या संख्येने दिसतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे विणीचा हंगाम संपवून पुन्हा जाण्यासाठी सज्ज होता. दरवर्षी हे पक्षी विणीच्या हंगामात पिलांना जन्म देऊन संगोपन करतात व त्यांच्या पंखात बळ आल्यानंतर येथून घेऊन जातात. विणीसाठी पक्षी झाडीलगतचा पाणीसाठा, पाथळीची ठिकाणे, उथळ पाण्याची ठिकाणे, जुनी झाडे या ठिकाणी घरटी करतात. आकाराने इवल्याशा बोटाएवढ्या पक्ष्यांपासून तर अगदी मोठ्या करकोच्यांपर्यंत वेगवेगळ्या आकारांचे पक्षी हजारो किमीचा प्रवास दरवर्षी करतात. परदेशी पक्षी तापमानातील बदल, हवामान, विणीची गरज, जनुकीय आदेश अशा विविध कारणांसाठी स्थलांतर करतात. हा प्रवास करताना पक्ष्यांना प्रकाश, हवामान यामुळे दिशा समजत जाते. प्रवास करताना वाटेत असंख्य अडथळे पार करावे लागतात. हवामान व एखाद्या बलवान पक्ष्याचा सामना करत त्यांना प्रवास करावा लागतो. माळढोकदेखील विणीसाठी प्रवास करतात. गेल्या वर्षी वन्यजीव विभाग पुणे यांनी एका माळढोक पक्ष्याला ट्रान्समिटर बसविला होता. त्याद्वारे माळढोक वर्षभरात १६०० चौ.किमी फिरल्याची नोंद झाली. यामध्ये अक्कलकोटपासून लातूरपर्यंत त्याचा प्रवास झाला. शेती, उजाड माळरान अशा ठिकाणी त्याने जास्त वास्तव्य केले व पावसाळयात सप्टेंबर आॅक्टोबरमध्ये सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथे विणीसाठी आला. - सुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग