शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची ११५ जणांवर कारवाई

By admin | Updated: January 1, 2017 04:40 IST

नववर्ष स्वागताच्यानिमित्ताने शहरामध्ये मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या ११५ जणांविरुद्ध शहर वाहतूक पोलिसांकडून ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची कारवाई करण्यात आली. शुक्रवार आणि

पुणे : नववर्ष स्वागताच्यानिमित्ताने शहरामध्ये मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या ११५ जणांविरुद्ध शहर वाहतूक पोलिसांकडून ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची कारवाई करण्यात आली. शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवस केलेल्या कारवाईची ही आकडेवारी आहे. दहा विशेष वाहनांच्या मदतीने तीन दिवस सलग जनजागृती करण्यात आल्यानंतर, थेट कारवाईला सुरुवात करण्यात आली.थर्टी फस्टच्या निमित्ताने शहरात पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. पार्ट्यांमध्ये तसेच बारमध्ये मद्यपान करुन वाहन चालवल्यामुळे अनेकदा किरकोळ, तसेच गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. यामुळे निरपराध नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या कारवाईसाठी पोलिसांनी १०० ब्रेथ अ‍ॅनालायझरचा वापर केला असून मध्यरात्रीपर्यंत ही कारवाई सुरू होती. यासोबतच घातपाती कारवाया आणि गडबड गोंधळ टाळण्यासाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पाच हजार पोलीस सुरक्षेसाठी सज्ज ठेवण्यात आले होते. कोरेगाव पार्क, चांदनी चौक, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रोड, एफसी रोड, जंगली महाराज रोड, एमजी रोड या ठिकाणी होणारी मोठी गर्दी लक्षात घेता गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आली होती. (प्रतिनिधी)