दौंड : वडगावबांडे (ता. दौंड) परिसरात ग्रामस्थांनी दारूअड्डे उद्ध्वस्त करून दारू रस्त्यावर फेकल्याने दारूधंद्येवाल्यांची धावपळ उडाली. ग्रामपंचायतीने ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. तरीदेखील अवैध दारू व्यवसाय सुरू असल्याने ग्रामस्थ संतापले होते. शाळेजवळच दारूविक्रीचा व्यवसाय सुरू होता. गावात चार दारूविक्रेते आहेत. यांचा उपद्रव शाळकरी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना होत होता. त्यामुळे ग्रामस्थांनी दारूधंदे उद्ध्वस्त केले. तसेच पोलिसांनी दारूधंदे बंद करण्यासाठी मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सरपंच शिवाजी गरदडे, तानाजी मेमाणे, शिवाजी जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला.(वार्ताहर)
वडगावबांडे येथे दारूधंदे उद्ध्वस्त
By admin | Updated: February 2, 2015 02:17 IST