शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू निमरूलनासाठी औषध फवारणी

By admin | Updated: November 12, 2014 23:15 IST

राज्यात अनेक ठिकाणी डेंग्यूची साथ पसरून घबराट पसरली आहे. यामुळे ग्रामस्थांनी घाबरून न जाता सुरक्षा उपाय म्हणून पाणी साठवणो टाळायला हवे.

कुरुळी : राज्यात अनेक ठिकाणी डेंग्यूची साथ पसरून घबराट पसरली आहे. यामुळे ग्रामस्थांनी घाबरून न जाता सुरक्षा उपाय म्हणून पाणी साठवणो टाळायला हवे. 
घरातील पाणी साठवणुकीचे पिंप आठवडय़ातून एकदा पालथे करून, पूर्ण रिकामे करून स्वच्छ करायला हवी. एकंदरीतच डेंग्यूच्या डासांचा बंदोबस्त नागरिकांनीच करायला हवा, असे आव्हान कुरुळीच्या सरपंच प्रमिला मु:हे यांनी केले.
डेंग्यूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असल्याने गावपातळीवर अनेक ग्रामपंचायती धुरळणी व औषध फवारणी करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून येथे औषध फवारणी करण्यात आली. कुरुळी येथील ग्रामपंचायतीतर्फे गायकवाड, घाडगे वस्ती, सोनवणोवस्ती, गावठाण, कांबळेवस्ती आदी ठिकाणी फॉगिंग मशिनने औषध फवारणी, जंतुनाशक पावडर टाकून प्रतिबंधक उपाय केले आहेत. पुढील काळात दर आठ दिवसांतून एकदा फवारणी करण्यात येणार असल्याचे ग्राम विकास अधिकारी छाया इरनक यांनी सांगितले.
 उपसरपंच बेबीताई कड, माजी सरपंच आशा सोनवणो, तेजस्विनी बागडे, आशिष मु:हे, एकनाथ सोनवणो, नितीन गायकवाड, मारुती मु:हे, बाळासाहेब बागडे, संजय बधाले, पांडुरंग गुरव, आनंद बागडे, शुभांगी कांबळे, कमर्चारी उपस्थित होते.
 
डेंगी एनएस-1 या रक्तचाचणीतून नेमके निदान होते. तसेच पाचव्या दिवसानंतर दुस:या दोन रक्त तपासण्यांतून नेमके निदान होते. त्याचा निष्कर्ष काहीही आला, तरी उपचार बदलत नाहीत. उपचार फक्त हिमोग्राम व रुग्णात दिसणारी लक्षणो यावर अवलंबून असतात. त्यामुळे सरसकट या चाचण्या करण्यात अर्थ नाही. पोटात, छातीत पाणी, मूत्नपिंड, यकृत यांना इजा हे ओळखण्यासाठीच्या तपासण्या आहेत. पण, गुंतागुंत डेंग्यू झालेल्या फक्त काही जणांमध्येच त्याची खरी गरज असते. सर्व शास्त्न गुंडाळून अनेक ठिकाणी अकारण तपासण्या करण्याचा मारा चालू आहे. निदान रुग्णांनी त्याची मागणी करू नये.
- डॉ. कुलदीप पवार