शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

औषध दुकाने २४ तास खुली

By admin | Updated: May 30, 2017 03:24 IST

आॅनलाइन फार्मसी आणि ई-पोर्टलच्या विरोधात औषध विक्रेत्यांनी एकदिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या वेळी रुग्णांचे औषधांअभावी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आॅनलाइन फार्मसी आणि ई-पोर्टलच्या विरोधात औषध विक्रेत्यांनी एकदिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या वेळी रुग्णांचे औषधांअभावी हाल होऊ नयेत, यासाठी तातडीच्या सेवेची सोय करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे खासगी रुग्णालयांमधील २४ मेडिकल स्टोअर सुरु ठेवण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील सुमारे सात हजार औषध दुकाने आज बंद राहणार आहेत. रुग्णांचे हाल होऊ देणार नसल्याची भूमिका घेत पुणे जिल्हा औषध विक्रेता संघटनेने काही हेल्पलाईन क्रमांकांची यादी अन्न आणि औषध प्रशासनाकडे सुपूर्त केली. त्याच वेळी एफडीएतर्फे शहरासह जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमधील औषध दुकाने खुली ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे विभागाचे सहआयुक्त ए. एम. खडतरे यांनी दिली.पुणे शहरातील भारती हॉस्पिटल, पूना, दीनानाथ मंगेशकर, सह्याद्री, कोलंबिया एशिया, रत्ना मेमोरियल, इनामदार, नोबेल, जहांगीर, रुबी, जोशी, मेडप्लस, अपोलो, केईएम, इनलॅक्स बुधराणी, देवयानी हॉस्पिटल, एमजेएम हॉस्पिटल अशा सुमारे शंभर हॉस्पिटलमध्ये औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत. ही औषध दुकाने २४ तास सुरु राहणार आहेत. या ठिकाणी पेशंटना औषधे उपलब्ध होणार आहे. औषधांसाठी नागरिकांनी एफडीएशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुुक्त सुहास मोहिते यांनी केले.